युवा संवाद यात्रा:संगमनेरची शिक्षण, सहकार, बंधूभावाची परंपरा पुढे न्या; आमदार बाळासाहेब थोरात यांचे तरुणांना आवाहन

2 hours ago 1
१९८५ च्या नंतर तालुक्याच्या राजकारणाची दिशा बदलली . सततच्या विकास कामांमधून आज संगमनेर तालुका हा राज्यातील प्रगतशील असलेल्या तालुक्यांमध्ये आहे. येथील शिक्षण, सहकार, बंधूभावाचे वातावरण अत्यंत चांगले वातावरण आहे. हीच परंपरा तरुणांना पुढे न्यायची आहे. संगमनेर तालुक्याच्या चांगल्या राजकारणाची संस्कृती पुढे घेऊन जा, असे आवाहन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. स्वराज्याची संकल्पना देणाऱ्या पेमगिरी येथील ऐतिहासिक शहागडावर विजयादशमीच्या मुहूर्तावर पारंपरिक वाद्य, सनई चौघडे, ढोल ताशांच्या गजर, सूर आणि संभळाच्या साथीने भारावून टाकणाऱ्या मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांबरोबर तालुक्यातील १७१ गावांमधील तरुणांशी संवाद साधण्यासाठी डॉ. जयश्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेसच्या वतीने युवा संवाद यात्रेचा प्रारंभ झाला. त्यावेळी आमदार थोरात बोलत होते. यावेळी माजी आमदार डॉ सुधीर तांबे, युवक काँग्रेस अध्यक्ष डॉ जयश्री थोरात, दुर्गा तांबे आदी उपस्थित होते. आमदार थोरात म्हणाले, शहाजीराजांनी याच ठिकाणाहून स्वराज्याची संकल्पना मांडली. सर्वधर्म समभाव जोपासणारा विचार आपल्या सर्वांना पुढे घेऊन जायचं असल्याचे ते म्हणाले. डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या, युवा संवाद यात्रा ही तालुक्यातील १७१ गावे व २५८ वाड्यावस्त्यांवरील तरुणांशी संवाद साधणार आहे. संगमनेर तालुक्यातील चांगल्या राजकारणाची संस्कृती आणि स्वाभिमान प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी युवक काम करतील. १२ दिवसात ५०० किमी प्रवास ही युवा संवाद यात्रा तालुक्यातील १७१ गावे व २५८ वाड्यावास्त्यांवर जाऊन युवक काँग्रेसचे हजारो तरुण १२ दिवसांत ५०० किमीचा प्रवास करणार आहेत. यावेळी युवा संवाद यात्रेतील सर्व तरुण तालुक्याच्या सुसंस्कृत राजकारणाबरोबर येथील समृद्ध परंपरा याबाबत विविध गावांमधील युवक, नागरिक व महिलांबरोबर ते संवाद साधणार आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article