रत्नागिरी : पद्मश्री डॉ. के. एच. घरडा यांचे निधन

2 hours ago 1

डॉ. के. एच. घरडा

पुढारी वृत्तसेवा

Published on

30 Sep 2024, 5:05 pm

Updated on

30 Sep 2024, 5:05 pm

चिपळूण : पद्मश्री डॉ. के. एच. घरडा यांचे सोमवारी (दि.३०) वृद्धापकाळाने निधन झाले. लोटे येथील घरडा केमिकल्स कंपनी, लवेल येथे घरडा अभियांत्रिकी महाविद्यालय, बाई रतनबाई घरडा यांच्या नावाने समाजासाठी खूप काही दान देणारे डॉ. घरडा, अशी त्यांची ओळख होती. निधना प्रसंगी ते 95 वर्षांचे होते.

लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये त्यांनी 40 वर्षांपूर्वी घरडा केमिकल्स लिमिटेड या कंपनीची स्थापना केली. कृषी रसायनामध्ये ही कंपनी कार्यरत असून, या क्षेत्रात त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले. त्यामुळे त्यांना शासनाने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला. डॉ. घरडा यांना आजवर अनेक पुरस्कार मिळाले असून आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील त्यांचा सन्मान झालेला आहे.

लोटे आणि चिपळूण परिसरात त्यांनी घरडा फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबविले. आजही त्यांचे कार्यक्रम सुरू आहेत. लवेल येथे घरडा रुग्णालय देखील त्यांनी उभे केले आहे. या कंपनीने लोटे आणि डोंबिवली येथे कार्यविस्तार केला. मुंबईतील वांद्रे येथे त्यांचे मुख्य कार्यालय आहे. या शिवाय गुजरातमध्ये देखील या व्यवसायाचा पसारा वाढला आहे. त्यांच्या निधनानंतर लोटे औद्योगिक परिसरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article