महिला मेळाव्यातून काँग्रेसचे विचार घराघरात पोहोचवण्याचा मानस- डॉ. शिलु चिमुरकर:वाढदिवसानिमित्त महिला मेळाव्याचे आयोजन

3 hours ago 1
अलिकडे देशात अस्थिरता माजली असली तरी आपल्या जबाबदारीप्रती सजग राहण्यासंदर्भात महिलांपर्यंत विचार पोहोचवल्या जात नसल्याने त्या अपप्रचाराच्या बळी ठरतात. यातून महिलांना बाहेर काढून त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी महिला मेळाव्याचे आयोजन करून काँग्रेसची सामान्य कार्यकर्ता म्हणून काँग्रेसचे विचार घराघरात पोहोचवण्याचा मानस असल्याची माहिती काँग्रेस नेत्या डॉ..शिलु चिमुरकर यांनी महिला मेळाव्यात दिली. गडचिरोली मधील अर्मोरी येथील देसाईगंज येथे काँग्रेस नेत्या डॉ. शिलु चिमुरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महिला मेळाव्यात महिलांना काँग्रेसचे विचार घराघरात पोहोचवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. त्यांनी महिलांचे सक्षमीकरण करून त्यांना अपप्रचारापासून वाचवण्याची गरज अधोरेखित केली. या कार्यक्रमात अनेक नेते आणि महिलांचा उत्स्फूर्त सहभाग होता. कार्यक्रमाचा व्हिडिओ... देसाईगंज येथील नगर परिषद कार्यालयासमोरील सांस्कृतिक भवनात आयोजित काँग्रेस नेत्या डॉ.शिलु चिमुरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला उसळलेल्या प्रचंड महिलांना संबोधित करताना त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर माजी आमदार आनंदराव गेडाम, डॉ़. महेश कोपुलवार, देसाईगंज तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र बुल्ले, डॉ. मेघा सावसाकडे, युवा नेते पिंकु बावणे, लिलाधर भर्रे, ओबीसी प्रदेश सरचिटणीस मनोज ढोरे, समाजवादी पक्षाचे ईलियास खान,महादेव कुंमरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article