राज ठाकरेंची लाडकी बहीण योजनेवर टीका:पुढचे पाच वर्षे योजना सुरू राहणार, देवेंद्र फडणवीसांनी दिले प्रत्युत्तर

5 days ago 3
महाराष्ट्र नवनिर्माण अध्यक्ष राज ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेवर टीका केली आहे. पुढचा एक महिना सरकारकडून या योजनेचे पैसे मिळतील, त्यानंतर पैसे मिळणार नाहीत, लाडकी बहीण योजनेचे पैसे पुढच्या दोन महिन्यात बंद होतील, असे राज ठाकरे यांनी म्हणले आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, लाडकी बहीण योजना ही पाच वर्षांपर्यंत चालणार आहे. या योजनेसाठी लागणारा निधी सरकारने आधीच तयार करून ठेवला आहे. त्यामुळे विरोधक काही बोलत असले तरी मात्र लाडकी बहीण योजना निरंतर सुरू राहणार आहे, असे प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या टीकेला दिले आहे. पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, अनेक लोक वल्गना करत आहेत, चुकीचे सांगत आहेत. लाडकी बहीण योजनेसाठी लागणारे सर्व पैसे बजेटमध्ये ठेवलेले आहेत. ही लाडकी बहीण योजना आताही चालू राहणार, पुढेही चालणार आणि पुढचे पाच वर्ष टिकणार, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. काय म्हणाले होते राज ठाकरे? राज ठाकरे त्यांच्या सभेत म्हणाले, मी तुम्हाला लिहून देतो, लाडकी बहीण योजनेचे गेल्या काही महिन्यांचे पैसे येतील कारण निवडणुका तोंडावर आहेत. या देखील महिन्याचे पैसे येतील. पुडच्या महिन्याचे येतील नंतर येणार नाहीत. याच्या भरवशावर बसू नका, हे जे पैसे वाटणे सुरू आहे, यावरून जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्र सरकारकडे पगार द्यायला पैसे नसतील. पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, कोण मागत आहे फुकट, महिलांच्या हाताला काम द्या, त्या कमवतील पैसे, त्या बळकट आहेत, गरीबाला पैसे, मजुराला पैसे, शेतकऱ्यांना वीज फुकट द्या, शेतकरी कुठे मागतोय फुकट वीज, ते फक्त विजेत सातत्य मागत आहे, राज्यात कोणीच फुकट काही मागत नाही, यांना त्या सवयी लावायच्या आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article