राज ठाकरेंच्या घरी सुनेचा जाच होतो का?:तुमची पत्नी खाष्ट सासू आहे का? उद्धव ठाकरेंना खाष्ट सासू म्हणणाऱ्या मनसेवर ठाकरे गटाचा हल्ला

3 days ago 2
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना खाष्ट सासूची उपमा देणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी जोरदार पलटवार केला आहे. राज ठाकरे यांच्या पत्नी आता सासू झाल्या आहेत. त्यामुळे तुमच्या घरातही असेच प्रकार घडत आहेत का? असा सवाल त्यांनी या प्रकरणी राज यांना केला आहे. या आरोपांमुळे ठाकरे गट व मनसेतील राजकीय वैमनस्य एका नव्या उंचीवर पोहोचले आहे. राज ठाकरे यांनी एका सभेत उद्धव ठाकरे यांना खाष्ट सासूची उपमा दिली होती. उद्धव ठोाकरे एखाद्या खाष्ट सासूसारखे असल्यामुळे अनेकजण शिवसेना सोडून बाहेर पडले, असे ते म्हणाले होते. त्यांच्या ही टीका ठाकरे गटाच्या चांगलीच जिव्हारी लागली होती. मुंबईच्या माजी महापौर तथा ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी या मुद्यावरून थेट राज यांच्यावर पलटवार केला आहे. तुमची बायको अमितच्या बायकोला खाष्टपणा दाखवते का? तुम्ही खाष्ट सासू असा शब्द वापर एका स्त्रीला बदनाम केले. असे करणारे तुम्ही कोण? आता तुमची पत्नीही सासू झाली आहे. खाष्ट सासू म्हणजे काय? तुमच्या घरातही असेच प्रकार घडत आहेत का? तुमची बायको अमितच्या बायकोला खाष्टपणा दाखवत आहे का? अशा विविध प्रश्नांची सरबत्ती किशोरी पेडणेकर यांनी राज ठाकरे यांच्यावर केली आहे. त्या पुढे म्हणाल्या, अनुभव असल्याशिवाय असे कुणीही बोलत नाही. आम्हाला खाष्ट सासू मिळाली नाही. आम्हाला प्रेमळ सासू मिळाली. त्यामुळे घरात खाष्ट सासू आहे, तो अनुभव घेऊन तु्ही उद्धव ठाकरे यांच्या स्वभावाविषयी बोलत असाल तर सुरुवात तुमच्याच घरापासून करावी लागेल. तुमच्याच घरात सुनेला जाच होतो की काय? असा आमचा प्रश्न आहे. खाष्ट सासू म्हणून हिनवणे हा स्त्रियांचा अपमान आहे. आता पाहू राज ठाकरे नेमके काय म्हणाले होते? राज ठाकरे यांनी शिवडी विधानसभा मतदारसंघातील प्रचारसभेत उद्धव ठाकरे यांना खाष्ट सासूची उपमा दिली होती. ते म्हणाले होते, एका माणसाने सगळ्या पक्षाची वाट लावली. अनेक त्यांचा पक्ष सोडून गेले. त्यांना ते गद्दार म्हणतात. पण खरा गद्दार तर घरात बसला आहे. तुम्ही पक्षाशी गद्दारी केली. उद्धव ठाकरे यांच्यामुळे सर्वजण शिवसेनेतून बाहेर पडले. या माणसाच्या वागणुकीमुळे प्रथम नारायण राणे बाहेर पडले. त्यानंतर मी बाहेर पडलो. आता एकनाथ शिंदे. ज्या छगन भुजबळ यांनी बाळासाहेब ठाकरे यांना त्रास दिला, त्या भुजबळांना उद्धव ठाकरे यांनी घरी जेवण्यास बोलावले. उद्धव एखाद्या खाष्ट सासूसारखा आहे, ज्याला सोडून सगळ्या सुना गेल्या.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article