रिक्षाचालकांनी मतदान केंद्राच्या 100 मीटर अंतरावरच प्रवाशांना सोडावे:नियम भंग केल्यास कारवाई, सहायक पोलिस आयुक्तांचे निर्देश
2 days ago
2
ऑटोरिक्षा चालकांनी गणवेश घालूनच रिक्षा चालवावी. मतदान केंद्राच्या १०० मीटर दूर रिक्षा उभी करून प्रवाशांची ने आण करावी. नियमांचे उल्लंघन केले तर त्या रिक्षा चालकांवर नियमाप्रमाणे कठोर कारवाई केली जाईल. असे निर्देश वाहतूक विभागाचे सहायक पोलिस आयुक्तांनी ऑटोरिक्षा चालकांना दिली आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. ज्येष्ठ, अपंग, आजारी मतदारांना मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर घेऊन जाणे व परत घरी पोहोचवण्यासाठी ऑटोरिक्षांची नियुक्ती केली आहे. तसेच उमेदवारांकडूनही ऑटोरिक्षा उपलब्ध करून दिल्या जातात. अनेक मतदान केंद्र गल्लीबोळाने आहेत. मतदानाची प्रक्रिया दिवसभर चालणार आहे. त्यामुळे ऑटोरिक्षा चालकांनी वाहतूक नियमांचे व आदर्श आचार संहिताचे पालन करावे, यासाठी वाहतूक विभाग सहायक पोलिस आयुक्तांनी मंगळवारी ऑटोरिक्षा चालक मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावून त्यांच्याशी संवाद साधला. तसेच सर्व ऑटोरिक्षा चालकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले. यामध्ये सर्व ऑटोरिक्षा चालकांनी गणवेश घालूनच रिक्षा चालवावी. आसन क्षमता ३+१ आहे तेवढेच प्रवासी वाहतूक करावी. मतदान केंद्रावर प्रवासी वाहतूक करताना १०० मीटर अंतरावर सोडणे व तिथूनच ते परत घेऊन जावे. इतर वाहनांना ये जा करण्यासाठी त्रासदायक होईल अशा प्रकारे रिक्षा उभ्या करू नये. आदी नियमांचे पालन करण्याचे आदेश दिले. यावेळी ऑटोरिक्षा चालक मालक कृति महासंघाचे अध्यक्ष निसार अहेमद खान, न्यू जनता युनियनचे अध्यक्ष अब्दुल रशिद खान, छावाचे प्रकाश हेगडे, शेख अमजद आदी उपस्थित होते.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)