पिंपरी-चिंचवड शहरातील शास्तीकर, साडेबारा टक्के परतावा यांसारखे अवघड प्रश्न आपण सोडवले. काळजी करू नका आमदार महेश लांडगे यांनी रेड झोन आणि निळ्या पूरररेषेतील बांधकामे हा प्रश्न बराच पुढे नेला आहे. येत्या काळात रेड झोन आणि निळ्या पूररेषेतील बांधकामांचा प्रश्न देखील सोडवला जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान, महाराष्ट्रातील अनेक उद्योग गुजरातला पळवले जात असल्याचे ‘फेक नरेटिव्ह’ शरद पवार आणि त्यांची कन्या सुप्रिया सुळे करत असून ‘फेक नेरेटिव्ह’ची यांच्याकडे फॅक्टरी आहे, अशा शब्दांत फडणवीस यांनी टीका केली.
महायुतीचे भोसरी विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ चिखली म्हेत्रेवस्ती येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर आमदार अमित गोरखे, शिवसेनेचे उपनेते इरफान सय्यद , समन्वयक विजय फुगे, माजी महापौर मंगला कदम, राहुल जाधव, नितीन काळजे, माजी उपमहापौर शरद बोर्हाडे, माजी स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, संतोष लोंढे, राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट आदी उपस्थित होते.