लैंगिक अत्याचाराचा कळस:11 वर्षीय मुलावर 9 जणांकडून अनैसर्गिक कृत्य, आरोपी ताब्यात

2 days ago 2
राज्यात बाललैंगिक अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. शाळेतील अल्पवयीन मुली असतील अथवा चिमुकल्या असतील यांच्यावर लैंगिक अत्याचारांच्या घटना महाराष्ट्रात घडताना दिसत आहेत. यातच आता आणखी एक विचित्र घटना समोर आली आहे. 11 वर्षांच्या एका अल्पवयीन मुलावर 9 जणांनी मिळून सामूहिक अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात 11 वर्षांच्या अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार झाला आहे. शहरातील 9 जणांनी मिळून या अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केले असून अत्याचार करणारे नराधम देखील अल्पवयीन असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अत्याचार प्रकरणी पीडित मुलाच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली असून आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 वर्षीय अल्पवयीन मुलास धमकावून या 9 आरोपींनी अनैसर्गिक अत्याचार केल्याचे समजते. हे 9 आरोपी देखील अल्पवयीन असल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. दरम्यान, या घटनेमुळे राज्यात पुन्हा एकदा बाललैंगिक अत्याचारच्या घटनांची गंभीर परिस्थिती समोर आली आहे. दरम्यान, राज्यात बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार आणखी प्रकाशझोतात येण्यास सुरुवात झाली. पुण्यात देखील शाळेच्या बस चालकाने दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना काही दिवसांपूर्वीच घडली होती. या नाराधमांना वयाचे भान राहिले नव्हतेच, आता श्रीरामपूरच्या घटनेनंतर तर लिंगाचेही भान राहिले नसल्याचे दिसत आहे. या घटनांवर आळा घालण्यासाठी कठोर कायदे व तातडीने कारवाई करणे अत्यंत गरजेचे झाले असल्याचे दिसत आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article