लोकशाही मजबुतीसाठी लहानग्यांची निवडणूक:रायसाहेब मोती संगई इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थी परिषद निवडणूक

1 day ago 1
सीताबाई संगई एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित रायसाहेब मोती संगई इंग्लिश स्कूलमध्ये सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकशाही पद्धतीने निवडणूक प्रक्रिया व मतदान जनजागृती करण्यासाठी शालेय स्तरावर विद्यार्थी परिषद निवडणूक घेण्यात आली. लोकशाही मार्गाने विद्यार्थी परिषद निवडणूक पार पडली. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला. सध्याचे राजकारण, बदलत्या राजकीय भूमिकेमुळे सर्वसामान्य जनता गडबडून गेली आहे. लोकशाहीला टिकून ठेवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या निवडणूक पद्धतीचे महत्व कमी होत असल्याचे दिसून येत आहे. तेव्हा शाळा महाविद्यालय स्तरावर निवडणूक प्रक्रिया कशी हाताळावी यासाठी रायसाहेब मोती संगई इंग्लिशच्या मुख्याध्यापिका व शिक्षकांच्या संकल्पनेतून शैक्षणिक २०२४-२५ साठी विद्यार्थी परिषद स्थापन करीत निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. निवडणूक प्रक्रियेतील मतदान पेटी, डमी मतपत्रिका, केंद्र प्रमुख, निवडणूक निर्णय अधिकारी, मतदान केंद्र स्थापन करून, विद्यार्थ्यांनी मतदार म्हणून मतदानाचा अधिकार बजावला आहे. या निवडणूक प्रक्रियेत आपला पक्ष स्थापन करून वर्गासाठी वर्ग प्रतिनिधी म्हणून अनेकांनी आप-आपला उमेदवार निवडून यावा म्हणून प्रचारही केला.त्यानंतर मतदान घेऊन मतमोजणी पार पाडण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या अनोख्या उपक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी सहकार्य केले. शाळेच्या मुख्याध्यापिका अंशुजा तळणकर, उपमुख्याध्यापिका विश्वजा दर्यापूरकर, समन्वयिका सांत्वना कथे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सीताबाई संगई सोसायटीचे अध्यक्ष अविनाश संगई, उपाध्यक्ष उल्हास संगई, सचिव विवेक संगई, सहसचिव प्रसाद संगई, अजय संगई, आशिष संगई तथा सर्व सभासदांनी अनोख्या उपक्रमाबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article