Baba Siddique Death Post Mortem : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची काल गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणात आता घडामोडींना वेग आला आहे. बाबा सिद्दिकी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे. याबाबतचे अपडेट्स काय आहेत? वाचा सविस्तर...
बाबा सिद्दिकीImage Credit source: Facebook
माजी मंत्री, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे, नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मुंबईतील वांद्रे भागातील निर्मल नगरमध्ये बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. शनिवारी रात्री 9.15 ते 9.20 च्या सुमारास बाबा सिद्दीकी यांच्यावर हल्ला झाला. या हल्ल्यात बाबा सिद्दिकी यांचा मृत्यू झाला आहे. आता बाबा सिद्दिकी यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन केलं जाणार आहे. यासाठी अंधेरी भागातील कूपर रूग्णालयात बाबा सिद्दिकी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे. यावेळी बाबा सिद्दिकी यांचे पुत्र झिशान सिद्दिकी अॅम्ब्युलन्समध्ये होते. वडिलांच्या हत्येनंतर झिशान सिद्दिकी यांना पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले.