वरळी, माहीममध्ये 5 ते 6.5% जास्त मतदान:वाढलेले मतदान दोन्ही ठाकरे पुत्रांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता
5 hours ago
1
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणूक लढवत असलेल्या माहीम मतदारसंघात यंदा मुंबईत सर्वाधिक ५९ टक्के मतदान झाले आहे. २०१९ मध्ये ५२.६९ टक्के मतदान झाले होते, तर आदित्य ठाकरे मैदानात असलेल्या वरळीत ५३.५३ टक्के मतदान झाले. गेल्या वेळी येथे ४८.१४ टक्के मतदान झाले होते. हा वाढलेला ५ ते ६.५ टक्का ठाकरे राजपुत्रांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. मुंबईतील ३६ मतदारसंघांपैकी १० मुंबई शहरात आहेत, तर उरलेले १६ उपनगरांमध्ये विखुरलेले आहेत. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये येणाऱ्या विधानसभेच्या या ३६ जागांवर चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. मुंबईतून अनेक दिग्गज नेते, मंत्री आणि राजकीय कुटुंबातील सदस्य निवडणूक रिंगणात आहेत. त्यापैकी माहीम आणि वरळी या हे दोन महत्त्वाचे मतदारसंघ आहेत. माहीममधून अमित ठाकरे आणि वरळीतून आदित्य ठाकरे निवडणूक रिंगणात आहेत. मुंबई शहर जिल्ह्यात एकूण ५२.६९ टक्के मतदान झालं आहे. जिल्ह्यात एकूण २५ लाख ४१ हजार ८१० मतदारांपैकी १३ लाख ३९ हजार २९९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे. यामध्ये पुरुष मतदार ७ लाख १० हजार १७४, स्त्री मतदार ६ लाख २९ हजार ०४९ मतदान झालं आहे. माहीम विधानसभा मतदारसंघात एकूण १ लाख ३३ हजार ३४३ मतदारांनी मतदान केले. त्यात पुरुष मतदार ६७ हजार ३५२ ,स्त्री मतदार ६५ हजार ९६४ मतदान झाले आहे. माहीममध्ये मनसेकडून अमित ठाकरे, शिंदेसेनेकडून सदा सरवणकर तर उद्धवसेनेकडून महेश सावंत असा सामना पाहावयास मिळाला. येथे मनसेविरुद्ध शिंदेसेना असा तणाव निर्माण झाला होता. त्याचा मतदारांवर कितपत परिणाम होतो, हे निकालानंतरच समोर येईल. वरळीत व्हायरल झालेल्या बनावट पाठिंबा पत्राने संभ्रम यंदा वरळीत मतदानाचा टक्का मोठ्या प्रमाणात वाढला. वरळी मतदारसंघही शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणूनच ओळखला जातो. येथे आदित्य ठाकरे यांची मनसेचे संदीप देशपांडे आणि शिंदेसेनेचे मिलिंद देवरा यांच्याशी लढत झाली. तिन्ही उमेदवारांच्या अजेंड्यावर हिंदुत्व आणि मराठीचा मुद्दा हेाता. मतदानाच्या दिवशी शिंदेसेनेकडून मनसेच्या पाठिब्यांचे पत्र व्हायरल झाल्याने मतदार संभ्रमित झाले होते. त्यामुळे नेमका निकाल कुणाच्या बाजूने लागतो, याविषयी कमालीची उत्सुकता आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)