उद्या येणार जनतेच्या कोर्टाचा फैसला:महाराष्ट्राच्या सत्तेचे 'केंद्र' कोणत्या नेत्याभोवती फिरणार? उद्धव ठाकरे, अजित पवार की एकनाथ शिंदे?
5 hours ago
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर जनतेचा कौल आता ईव्हीएम बंद झाला आहे. उद्या निवडणूक आयोगाचे कर्मचारी जनतेचा फैसला सुनावतील. अवघ्या काही तासांवर आलेला हा जनादेश कसा असेल? हे कुणालाच ठावूक असणार नाही. पण महाराष्ट्राच्या सत्तेचे केंद्र उद्धव ठाकरे, अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्या तिघांभोवतीच फिरेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. भाजपची राहणार सर्वात मोठी भूमिका निवडणुकीत भाजपची भूमिका सर्वात महत्त्वाची राहणार आहे. या भगव्या पक्षाकडे विधानसभेत सर्वाधिक आमदार आहेत. पण त्यानंतरही तो अडीच वर्षे सत्तेपासून दूर, तर 5 वर्षे मुख्यमंत्रीपदापासून दूर राहिला आहे. यावेळी या पक्षाने आपले सर्वाधिक उमेदवार उभे केलेत. बहुतांश राजकीय विश्लेषकांच्या मते, भाजप हाच या निवडणुकीत सर्वात मोठा राजकीय पक्ष ठरेल. पण भाजप स्वतःच्या बळावर आपले सरकार स्थापन करेल असा दावा एकही जण करत नाही. भाजपचे 100 हून कमी आमदार आले, तर... 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे 105 आमदार निवडून आले होते. पण या निवडणुकीत एवढे किंवा त्याहून अधिक आमदार निवडून येण्याची फार कमी असल्याचा अंदाज एक्झिट पोल्सने वर्तवला आहे. त्यामुळे भाजपचे 100 हून कमी आमदार निवडून आले तर सत्ता स्थापन करण्याचा खेळ अधिक रंजक होणार आहे. भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी पूर्णतः एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यावर अवलंबून रहावे लागेल. या अवलंबित्वाची किंमत कदाचित त्याला मुख्यमंत्रीपद देऊन चुकवावी लागल्यास आश्चर्य वाटू नये. मराठा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व अजित पवार हे दोन्ही नेते यासाठी तयार बसलेत. पण तूर्त जनता या दोन्ही नेत्यांच्या पक्षाला किती कौल देते? यावर सर्वकाही अवलंबून असणार आहे. अपक्ष असणार सर्वात पहिली पसंत यावेळी बंडखोर व अपक्षांनी मोठ्या प्रमाणात निवडणूक लढवली आहे. हे उमेदवार लक्षणीय संख्येने विजयी झाले तर भाजप शिंदे व अजित पवार यांच्यापेक्षा या उमेदवारांना सर्वाधिक पसंती देईल. भाजप या बंडखोर व अपक्षांना सोबत घेऊन आपला मुख्यमंत्री बनवण्याचा प्रयत्न करेल. उल्लेखनीय बाब म्हणजे 1995 मध्ये 45 अपक्ष विजयी झाले होते. त्यामुळे त्यांच्याच जोरावर राज्यात सरकार स्थापन झाले होते हे याठिकाणी लक्षात घ्यावे लागेल. कोण असेल मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? आता भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल हा सर्वात मोठा प्रश्न आहे. अपक्षांच्या जोरावर सरकार स्थापन झाले, तर मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस हे निर्विवादपणे पहिली पसंती असतील, कारण अपक्षांसह सरकार चालवणे तारेवरच्या कसरतीपेक्षा कमी असणार नाही. देवेंद्र फडणवीस यांनी माघार घेतली तर मागील अडीच वर्षांत सर्वांना सोबत घेऊन पुढे घेऊन जाण्याची ताकद एकनाथ शिंदे यांनी सिद्ध केली आहे. त्यातच भाजपने आपला मुख्यमंत्री करण्याचा आग्रह धरला, तर फडणवीस यांच्या सध्या तरी एकही नेता नाही. अपक्षांच्या बळावर सरकार स्थापन करण्याच्या स्थितीतील दुसरे समीकरण म्हणजे ओबीसींचे. महाराष्ट्रात मराठा व्यतिरिक्त ओबीसींचीही मोठी ताकद आहे. मराठा समाज भाजपवर नाराज आहे. तर ओबीसी भाजपसोबत आहेत. हा समुदाय आपल्यासोबत ठेवणे भाजपची राजकीय मजबुरी बनली आहे. महाराष्ट्रात भाजपने फडणवीसांच्या रूपाने ब्राह्मण मुख्यमंत्री 5 वर्षे आणि शिंदे यांच्या रूपाने अडीच वर्षे मराठा मुख्यमंत्री दिला आहे. त्यामुळे यावेळी भाजप मध्य प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही ओबीसी मुख्यमंत्री देण्याची शक्यताही दबक्या आवाजात राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. एकनाथ शिंदेंची शक्यता काय? एकनाथ शिंदे यांच्या 40 आमदारांनी पुन्हा निवडणूक जिंकली किंवा त्यांचे 40 हून अधिक आमदार निवडून आले तरच त्यांना पुन्हा मुख्यमंत्री होण्याची संधी आहे. त्यातही ते मुख्यमंत्री होण्यासाठी अजित पवार व अपक्षांच्या तंबूत त्यांच्यापेक्षा कमी आमदार असणे आवश्यक आहे. एवढेच नाही तर भाजपच्या आमदारांची संख्याही 100 हून कमी येणे हे शिंदे मुख्यमंत्री होण्यासाठी फार आवश्यक आहे, असे विश्लेषक म्हणतात. काँग्रेस हे निकालानंतरचे दुसरे महत्त्वाचे पात्र मतदानानंतरचे ट्रेंड असे सूचित करतात की, निकालानंतर काँग्रेस हा दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरू शकतो. देशातील या सर्वात जुन्या पक्षाकडे शरद पवार आणि उद्धव ठाकरे सारख्या मातब्बर नेत्यांची ताकद आहे. जनतेचा निर्णय या तिघांच्या बाजूने लागल्यास महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन निश्चित आहे. बहुमत नसेल तर... महाविकास आघाघाडीतील तिन्ही पक्षांना मिळून 145 किंवा त्याहून अधिक आमदारांचे स्पष्ट आणि पूर्ण बहुमत मिळाले नाही आणि खेळ अपक्षांच्या पाठिंब्याकडे वळला तर फार अवघड होईल. कारण, संसाधने गोळा करणे आणि सत्तेची शिडी उभारण्यात हे तिन्ही पक्ष कमी ठरण्याची शक्यता आहे. कारण, या खेळात भाजप या तिघांवर वरचढ ठरण्याची शक्यता आहे. तसेही अपक्ष उमेदवार नेहमीच सरकारच्याच दिशेने सरकतात असा इतिहास आहे. सरकार आले तर चेहरा कोण? महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले तर सरकारचा प्रमुख कोण असेल? हा प्रश्न संपूर्ण निवडणूक प्रचारात विचारला गेला. आपले सरकार पाडल्यानंतरच महायुतीचे सरकार स्थापन झाले, त्यामुळे आपल्याच नावाची मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून घोषणा करावी अशी उद्धव ठारे यांची इच्छा होती. पण, ज्याचे जास्त आमदार तोच मुख्यमंत्री होईल, असे शरद आणि काँग्रेसचे म्हणणे आहे. ही आदर्श परिस्थिती आहे. पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यामुळे घायाळ उद्धव आणि त्यांच्या समर्थक आमदारांचे मन यामुळे शांत होईल का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे भाजपने ज्या प्रकारे आपले सर्वाधिक आमदार असूनही शिंदे यांना मुख्यमंत्री करून आघाडीची सत्ता हिसकावून घेतली, तेच राजकीय शहाणपण काँग्रेस दाखवू शकेल का? 2004 मध्ये काँग्रेसपेक्षा जास्त आमदार असतानाही शरद पवार यांनी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद दिले होते. तेव्हापासून त्यांना अजित पवार व त्यांच्या समर्थकांची टीका सहन करावी लागत आहे. त्यामुळे यावेळीही ते तसे करू शकतील का? याविषयी साशंकता आहे. आता पाहू ठाकरे, पवार, शिंदेंचे समीकरण उद्धव ठाकरे अजित पवार एकनाथ शिंदे
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)