Published on
:
18 Nov 2024, 11:34 am
Updated on
:
18 Nov 2024, 11:34 am
ब्रिस्टॉल : पृथ्वी नष्ट होईल किंवा पृथ्वीवरून माणूस पूर्णपणे नामशेष होईल असे बर्याचदा ऐकलं असेल. आता पुन्हा एकदा एका रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. पृथ्वीवरील तापमान प्रचंड वाढेल आणि एक भयंकर पूर येईल, यात कोणताही सजीव वाचू शकणार नाही, असा दावा त्या रिसर्चमध्ये वैज्ञानिकांनी केला आहे. डायनासोरप्रमाणे पृथ्वीवरून सर्व सजीव नष्ट होतील, असे यात म्हटले आहे. ब्रिस्टल युनिव्हर्सिटीतील शास्त्रज्ञांनी कॉम्प्युटर सिम्युलेशन टेक्नॉलॉजीचा वापर करून हा अभ्यास सादर केला आहे.
ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच जागतिक तापमानवाढ ही सध्याच्या काळात भेडसावणारी एक मोठी समस्या आहे. याचदरम्यान शास्त्रज्ञांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. त्यानुसार पृथ्वीवरील सजीव नष्ट होणार आहेत. मागील काही वर्षांत आलेले भूकंप या घटनेची पुष्टी करतात. एक महाभयंकर पूर येईल आणि पृथ्वीवरील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण प्रचंड वाढेल, असेही म्हटले आहे. ब्रिस्टल युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी आणखी एक चकित करणारी माहिती दिली आहे. ते म्हणाले, ‘ग्लोबल वार्मिंग अपेक्षेपेक्षा कैकपट जास्त वेगाने वाढत आहे. यामुळे आता ते दिवस दूर नाहीत, जेव्हा पृथ्वीवर माणूस आणि प्राण्यांसह कोणताही सजीव प्राणी जिवंत राहू शकणार नाही.’
यावेळीही दर 250 मिलियन वर्षांप्रमाणे (सुमारे 25 कोटी) एक भयंकर पूर येईल, ज्यामुळे पृथ्वीवरील सर्व नष्ट होईल, असे या रिसर्चमधून समोर आले आहे. याचबरोबर पृथ्वीचे तापमान 70 अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल, ज्यामुळे कोणताही सजीव जिवंत राहू शकणार नाही. या रिसर्चनुसार वैज्ञानिकांच्या मते, पृथ्वीवरील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण खूप वाढेल आणि त्याची पातळी वाढल्यावर पृथ्वीचा नाश होईल. डायनासोर याच कारणाने नामशेष झाले होते. त्याच घटनेची आता पुनरावृत्ती होण्याची शक्यता वैज्ञानिकांनी वर्तवली आहे. 6.6 कोटी वर्षांपूर्वी जे घडले होते तसेच काहीसे आता पुन्हा घडण्याची शक्यता आहे. या रिसर्च टीमचे नेतृत्व अॅलेक्झांडर फार्नस्वर्थ यांनी केले आहे. कार्बन डायऑक्साईडची पातळी दुप्पट झाली आहे. येत्या काळात पृथ्वीचे महाद्वीप पँजिया अल्टिमा नावाच्या एका सुपरकॉन्टिनेंटमध्ये विलीन होतील, असे फार्नस्वर्थ म्हणाले.