Published on
:
18 Nov 2024, 1:28 pm
Updated on
:
18 Nov 2024, 1:28 pm
हदगाव : हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदार संघासाठी ८५ वया पेक्षा अधिक असलेले १९८ वृध्द तसेच १८ दिव्यांग अशा २१६ मतदारांची गृह मतदानासाठी नोंदणी झाली होती.या पैकी २०१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने ९३ टक्के मतदान झाले आहे. यात ७ मतदार घरी गैरहजर होते आणि नोंदणी झाल्यापैकी ८ मतदार मयत झाले आहेत, असे निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश कांबळे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी पल्लवी टेमकर, टपाली मतदान पथक प्रमुख जी.डी.हाराळे, एम.झेड सिद्दीकी,सुनिल राठोड यांनी सांगितले.
तालूक्यातील शिरड येथील १०४ वयाच्या जिजाबाई फकीरराव कल्याणकर यांनी गृह मतदानाचा हक्क बजावल्याने निवडणूक निरीक्षक (सामान्य) शैंलेन्द्र कुमार यांनी तसेच सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा हदगावच्या तहसिलदार सुरेखा नांदे यांनी शिरड येथे जावून वृद्ध जिजाबाई यांची भेट घेऊन त्यांचे कौतूक केले.(Maharashtra assembly polls)
जिजाबाई १०४ वयात मतदान करतात तेव्हा सर्व मतदारांनी मतदान केंद्रावर जावून मतदान करावे असे आवाहन निवडणूक निरीक्षक शैलेन्द्र कुमार यांनी उपस्थित नागरीकांना केले आहे. या आधीही निवडणूक निरीक्षकांनी तालुक्यातील ल्याहरी येथील बैल बाजारात जावून उपस्थित नागरीकांना निर्भयपणे मतदान केंद्रावर जाऊन मतदान करा असे आवाहन केले आहे.