उमेदवार आता मतदारांच्या घरोघरी जाऊन भेटी घेणार
२० नोव्हेंबरला मतदान
हिंगोली (Hingoli Assembly Elections) : विधानसभा निवडणूक प्रचाराच्या तोफा सोमवारी सायंकाळी ६ वाजता थंडावल्या. त्या निमित्ताने अनेक उमेदवारांनी रॅली काढून मोठे शक्तीप्रदर्शन केले. (Hingoli Assembly Elections) विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे १४ दिवस उमेदवारांना मिळाले. त्या निमित्ताने अनेक उमेदवारांनी आपापल्या कार्यकर्त्यांसह शहरी व ग्रामीण भागात प्रचार करून आपल्याला मतदान करावे असे साकडे घातले.
या प्रचारा निमित्त अनेक राजकीय पक्षांच्या नेते मंडळीच्या जाहीर सभा पार पडल्या. ग्रामीण व शहरी भागात उमेदवारांनी अनेक वाहनावर ध्वनीक्षेपक लावून प्रचार यंत्रणा राबविली. गुलाबी थंडीमध्ये प्रचाराचा चांगलाच धुराळा उडाला. सार्वत्रिक प्रचाराची सांगता १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता झाली. त्यामुळे प्रचाराच्या तोफा थंडावल्या. आता १९ नोव्हेंबरला उमेदवार प्रत्यक्ष मतदारांच्या भेटीगाठीला जाणार आहेत. २० नोव्हेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. त्या निमित्ताने अनेक उमेदवार व त्यांच्या समर्थकांकडून आपल्याला जास्तीत जास्त मतदान करून घेण्याकरीता रणनिती ठरवली जात आहे. (Hingoli Assembly Elections) प्रत्यक्ष मतदारांच्या भेटीला उमेदवार व त्यांचे समर्थक जाणार असल्याने त्यांच्यावरही निवडणूक आयोगाची करडी नजर राहणार आहे.