पाणी-शौचालय-रस्ता नाही, मतदान नाही:कोरेगावातील वाठार स्टेशनच्या गोपाळ समाजाचा मतदानावर बहिष्कार; मोर्चा काढून घोषणाबाजी
2 hours ago
1
विधानसभा निवडणूक दोन दिवसावर आली आहे आणि त्याच दरम्यान सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन येथील भटक्या विमुक्त समाजाच्या साधारणपणे साडेतीनशे ते चारशे लोकांनी वाठार स्टेशन येथे मोर्चा काढून आम्हाला मूलभूत सुविधांपासून अनेक वर्षे वंचित ठेवले आहे, आमच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे म्हणून येत्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी फलक घेऊन मोर्चा काढला व घोषणाबाजीही केली. जर मतदानापूर्वी जिल्हा प्रशासनाने गंभीरपणे याचा निर्णय घेतला नाही] तर आमचा मतदानावर बहिष्काराचा निर्णय कायम असेल] असेही आंदोलकांनी जाहीर केले आहे. भटक्या विमुक्त समाजातील गोपाळ समाजाची वस्ती गेल्या 60 ते 70 वर्षापासून वाटा स्टेशन येथे सरकारी जागेवर वसलेली आहे या समाजाने ग्रामपंचायत पासून ते खा लोकसभा निवडणुकीपर्यंत सर्वच निवडणुकातून मतदान केल्याची नोंद आहे. असे असले तरी या वस्तीला मूलभूत सुविधा नाहीत. रस्ते नाहीत. शौचालया अभावी महिला बाहेरच प्रात:विधी उरकतात. या वस्तीच्या शेजारीच कचरा डेपो असून तो मागणी करूनही हलवला जात नाही. घरकुलांची, गटारांची, पिण्याच्या पाण्याची मागणी आहे. परंतु, याकडे लोकप्रतिनिधींपासून ते जिल्हा प्रशासनापर्यंत सर्वजण दुर्लक्ष करत आहेत. म्हणून या भागातील या समाजाच्या लोकांनी विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. ठाकरे गटाचे प्रशासनाला आवाहन
आंदोलकांनी गटार नाही मतदान नाही, घरकुल नाही मतदान नाही, शौचालय नाही मतदान नाही अशा प्रकारचे फलक झळकवले. या आंदोलकांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल आवळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी भेट देऊन त्यांचे म्हणणे ऐकले व या प्रश्नांकडे प्रशासनाने मतदानापूर्वी लक्ष घालावे, असे आवाहन केले आहे. अन्यथा मतदान झाल्यानंतर उग्र आंदोलनाचा इशाराही दिला आहे. शिष्टमंडळासोबतची पोलिसांची चर्चा अनुत्तरीत दरम्यान वाठार स्टेशन पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांच्या शिष्टमंडळावर या प्रश्नी चर्चा केली. परंतु, तिथे काही निर्णय न झाल्याने वाठार स्टेशनच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामसेवक यांच्याबरोबर उद्या बैठक ठेवली आहे. असे सांगण्यात आले.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)