वेध निवडणुकीचे:विधानसभेत एकीने भरघोस यश मिळाल्यानंतर बेकीची भाषा

2 hours ago 1
विधानसभा निवडणुकीत भाजपने १३२ जागा जिंकल्यानंतर महायुतीत भाजप हाच मोठा भाऊ असल्याचे सिद्ध झाले. सत्ता येताच आता भाजपने स्वबळाचा नारा दिला आहे. आगामी महापालिका निवडणुकीत भाजप स्वतंत्र लढणार असल्याचे जाहीर केले. कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी सांगितले. दरम्यान, एमआयएमला रोखण्यासाठी आम्ही युतीचा प्रस्ताव देऊ. भाजपला युती मान्य नसल्यास आमचीही स्वतंत्र लढण्याची तयारी असल्याचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीत मनपाचे नगरसेवक कामाला लागले होते. नेत्याच्या सभांना नागरिकांना घेऊन जाणे, मतदारांच्या संपर्कात राहणे, मतदान करवून घेणे आदी कामे त्या-त्या भागांतील नगरसेवक करत होते. महायुतीच्या शहरातील तीन आणि शहराशी संलग्न असणाऱ्या फुलंब्री या चारही जागांवर विजय मिळवल्यामुळे त्यांचे परिणाम मनपा निवडणुकीत दिसणार आहेत. याबाबत भाजपचे प्रवक्ते, शहराध्यक्ष शिरीष बोराळकर म्हणाले की, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका भाजपने पूर्ण ताकदीने लढवल्या. आता कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या निवडणुका या स्वबळावर लढणार आहोत. त्यामुळे स्थानिक पातळीवर नवीन नेतृत्व तयार होण्यासदेखील मदत होणार आहे. ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. प्रभाग पद्धतीने होतील निवडणुका गेल्या पाच वर्षांपासून मनपाच्या निवडणुका झालेल्या नाहीत. आता फेब्रुवारीमध्ये या निवडणुकांची शक्यता बोराळकर यांनी वर्तवली आहे. प्रभाग पद्धतीने या निवडणुका होणार असल्याचा अंदाज भाजपकडून वर्तवण्यात येत आहे. आमचीही स्वबळावर लढण्याची तयारी एमआयएमला रोखण्यासाठी आम्ही युतीचा प्रस्ताव देणार आहोत. मनपाच्या निवडणुक देखील महायुतीत होतील, अशी अपेक्षा आहे. मात्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढवत असेल तर आम्हीदेखील तशी तयारी आहे. - राजेंद्र जंजाळ, जिल्हाप्रमुख, शिवसेना

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article