शरद पवारांनी ‘दिवटा’ म्हणताच सुनील टिंगरे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, पवारसाहेबांना…

2 hours ago 1

MLA Sunil Tingre connected Sharad Pawar Statement : शरद पवार यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांच्या या टीकेवर सुनील टिंगरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुनील टिंगरे नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर बातमी...

शरद पवारांनी 'दिवटा' म्हणताच सुनील टिंगरे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, पवारसाहेबांना...

शरद पवार, सुनिल टिंगरेImage Credit source: Facebook

| Updated on: Sep 28, 2024 | 7:53 AM

पुण्यातील खराडीमध्ये शरद पवार यांची सभा झाली. या सभेत बोलताना शरद पवार यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावर सडकून टीका केली. पवारांनी सुनील टिंगरे यांचा ‘दिवटा’ असा उल्लेख केला. तसंच पोर्शे कार अपघात प्रकरणाचा दाखलाही शरद पवार यांनी या भाषणात दिला. त्यांच्या या टीकेनंतर सुनील टिंगरे यांनी टीव्ही 9 मराठीला पहिली प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांच्या या टीकेवर सुनील टिंगरे यांनी उत्तर दिलं. शरद पवार माझ्यासाठी कालही आदरणीय होते, आज ही आहेत आणि उद्याही राहतील. त्यांना माझा कान पकडायचा अधिकार आहे. मी त्यांना प्रत्युत्तर देणं योग्या नाही. मला ते शोभत नाही, असं सुनील टिंगरे म्हणालेत.

शरद पवार काय म्हणाले होते?

रांजणगावला गेल्यावर जसं गणपतीचं दर्शन होतं. तसं उद्योगाचं दर्शन होतं. पुण्यात आज ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी काय केलं? पुण्याची चौकशी केली तर लोक काय सांगतात? कोयता गँग. बजाजचे कारखाने, किर्लोस्करांचे कारखाने हे पुण्याचे वैशिष्ट. अलीकडची पिढी काय खाते माहिती नाही, कसल्या तरी गोळ्या खातात. ते खाल्लं की चंद्रावर जातात. सत्ताधारी काय करतात? हा प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. आमचे आमदार दमदार आमदार. हा आमदार दमदार आहे? त्याचं नाव काय टिंगरे. तो कोणाच्या तिकिटावर निवडून आला? त्यावेळी नेता कोण होता? पक्षाची स्थापना कोणी केली? तुझा काय बंदोबस्त करायचा हे लोक करतील. चुकीच्या गोष्टींना पाठिंबा देवू नकोस, असं म्हणत शरद पवार यांनी जोरदार टीका केली होती.

बातमी अपडेट होत आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article