शर्ट इन न केल्याच्या रागातून शिक्षकाची विद्यार्थ्यास मारहाण:कानासह नाकातून आले होते रक्त, पालकांनी पोलिसांत केली तक्रार

2 hours ago 1
काॅम्प्युटरच्या क्लासला गेलेल्या एका मुलाने शर्ट इन केला नसल्याचा प्रकार शिक्षकांना वर्ग सुरु असताना दिसून आला. त्यामुळे त्यांनी ११ वर्षीय मुलास बेदम मारहाण केल्याने मुलाच्या कानातून व नाकातून रक्तस्त्राव हाेऊन मुलगा जखमी झाल्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. याप्रकरणी मुलाच्या पालकांनी संगणक शिक्षकाविराेधात स्वारगेट पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर पीडित मुलगा हा ११ वर्षाचा असून ताे सहावी इयत्तेत शिक्षण घेत आहे. क्लास रुममध्ये काॅम्प्युटरचा क्लास सुरु असताना, काॅम्प्युटरचे शिक्षक संदेश भाेसले (वय-२७) यांनी मुलास हाताने बेदम मारहाण केली. त्यामुळे मुलाच्या नाकातून व कानातून रक्त येऊ लागले. मुलगा शाळा सुटल्यानंतर घरी गेल्यावर मुलाने त्याच्या आईला घडलेला प्रकार सांगितला. त्यानुसार स्वारगेट पाेलिसांनी आराेपी शिक्षक विराेधात गुन्हा दाखल केला. याबाबत पुढील तपास पाेलिस उपनिरीक्षक एस तानवडे करत आहेत. जाब विचारणाऱ्या व्यक्तीवर हल्ला हडपसर परिसरातील भैरवनाथ मंदिर समाेर राहत असलेल्या नरेंद्र दत्ताेबा जाधव (वय-५६) यांना मंदिराजवळ 3 अनाेळखी व्यक्ती रात्री फिरताना दिसून आल्या. त्यामुळे त्यांनी तुम्ही इथे काय करता? उभे का आहात? इतक्या रात्रीचे कसे फिरता? अशी विचारणा केली. त्यावेळी याबाबतचा राग मनात धरुन सदर अज्ञात व्यक्तींनी शिवीगाळ करत, धक्काबुक्की करुन हाताने मारहाण जाधव यांना केली. तसेच एका आराेपीने काेयत्याने त्यांच्या डाेक्यात कपाळाचे वर मारुन त्यांना जखमी केले. या प्रकरणी हडपसर पाेलिस पुढील तपास करत आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article