शिक्षकाचा अपघातात मृत्यु (File Photo)
Published on
:
16 Oct 2024, 11:20 am
Updated on
:
16 Oct 2024, 11:20 am
अकोला : तेल्हारा तालुक्यातील अडगांव बु. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर कार्यरत असलेले शिक्षक सुभाष ढोकणे (49) यांचा दुचाकीने आपल्या गावी जात असतांना 14 ऑक्टोबर रोजी उमरा फाट्यानजिक अपघातात मृत्यु झाल्याची घटना घडली आह़े .
प्राप्त माहिती नुसार , कामानिमित्त ते १४ ऑक्टोबरला अकोट शहरात गेले होते .तिथून परत येताना रात्री 10:30च्या दरम्यान उमरा फाट्यानजिक त्यांची दुचाकी रस्त्यालगत पडलेल्या झाडाला धडकली या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होवून त्यांचे जागेवरच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांना अकोट ग्रामीण रुग्णालयात आणले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.