निवडणुकीआधी बंडोबांना केले थंड:प्रशांत परिचारकांसह अनेकांना 27 महामंडळांवर संधी, अध्यक्ष-उपाध्यक्षपदी नियुक्ती

2 hours ago 1
महायुती सरकारकडून ऐन विधानसभा निवडणुकीत अनेकांची राजी-नाराजी सुरू होण्यापूर्वीच अनेकांचे बंड थंड करण्याचा प्रयत्न केला आहे. पंढरपूर विधानसभेसाठी इच्छुक असलेले भाजपच्या प्रशांत परिचारक यांची सहकार कृषी पणन मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आशिष दामले यांना संधी देण्यात आली आहे. या निवडीबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार आणी राष्ट्रवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी दामले यांचे स्वागत केले आहे. दरम्यान, नाराज नेत्यांनी ऐन विधानसभा निवडणुकीत बंड पुकारुन डोकेदुखी वाढवू नये, यासाठी त्यांना महामंडळावर संधी देऊन निवडणुकीआधीच त्यांचे बंड थंड करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. कोणत्या महामंडळावर कुणाची नियुक्ती पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र राज्य मेंढी व शेळी विकास महामंडळ - विजय वडकुते अध्यक्ष, बाळासाहेब किसवे, संतोष महात्मे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य पेट्रोकेमिकल्स महामंडळ - अतुल काळसेकर, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ - राजेश पांडे, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य गोपीनाथ मुंडे ऊस तोड कामगार मंडळ - गोविंद केंद्रे, अध्यक्ष महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा) - बळीराम शिरसकर, सदस्य राजे उमाजी नाईक आर्थिक विकास मंडळ - दौलत नाना शितोळे, उपाध्यक्ष महाराष्ट्र वन विकास महामंडळ - अतुल देशकर, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य सहकारी बँक वेतन समिती - नरेंद्र सावंत, अध्यक्ष महिला आर्थिक विकास महामंडळावर (माविम) - मिनाक्षी शिंदे,अध्यक्षा, राणी द्विवेदी, उपाध्यक्ष आदिवासी विकास महामंडळ - काशिनाथ मेंगाळ, अध्यक्ष कै मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ - विजय चौगुले, उपाध्यक्ष आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, मुंबई - अजय बोरस्ते, उपाध्यक्ष महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ - भाऊसाहेब चौधरी, उपाध्यक्ष महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळांवर - आनंद जाधव, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ - कल्याण आखाडे, उपाध्यक्ष राज्य कंत्राटी कामगार सल्लागार मंडळ - श्रीनाथ भिमाले, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ग्राहक सरेक्षण परिषद - संदीप लेले अध्यक्ष, अरुण जगताप उपाध्यक्ष महाराष्ट्र रोजगार हमी परिषद - शहाजी पवार, अध्यक्ष लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ - दिलीप कांबळे, अध्यक्ष लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समिती - सचिन साठे, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोग - सतीश डोगा अध्यक्ष, मुकेश सारवान उपाध्यक्ष वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ - निलय नाईक, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सहकार विकास महामंडळ - अरविंद पोरट्टीवार, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सहकार कृषी पणन मंडळ - प्रशांत परिचारक, अध्यक्ष मौलाना आझाद अल्पसंख्यांक विकास महामंडळ - इद्रिस मुलतानी, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ - प्रमोद कोरडे, अध्यक्ष महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषद - प्रमोद कोरडे, अध्यक्ष

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article