Pusad crime Case: ज्वेलर्सच्या लॉकरमध्ये हात टाकून दुकानातून 109 ग्रॅम सोने लंपास

1 hour ago 1

दिवसाढवळ्या धाडसी चोरी, आठ लाखाचे सोने केले लंपास

पुसद (Pusad transgression Case) :  शहरातील सराफा लाईन मधील माऊली ज्वेलर्सच्या दुकानातून १०९ ग्रॅम वजनाचे सोने किंमत अंदाजे आठ लाख रुपये दिवसाढवळ्या लॉकरमध्ये हात टाकून लंपास केल्याची घटना दि. 16 ऑक्टोंबर रोजी सकाळी 10.45 वाजताच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे सराफा लाईन मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेप्रकरणी LCB पुसद शाखेचे पथक , शहर ठाणेदार उमेश बेसरकर,डिबी पथक घटनेचे गांभीर्य बघत तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

माऊली ज्वेलर्सच्या दुकानाच्या व समोरील सराफा दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद झाले आहेत. शहरातील सराफा लाईन मध्ये सतीश मधुकर वाकडे वय 59 वर्ष यांचे मालकीच्या असलेल्या माऊली ज्वेलर्स या दुकानात ही घटना घडलेली. दि.16 ऑक्टोबर रोजी सकाळी अंदाजे पावणे अकरा वाजता च्या दरम्यान दोन इसम ग्राहक म्हणून माऊली ज्वेलर्स या दुकानात आले. त्यांनी दुकान मालक सतीश मधुकर वाकडे यांना सोन्याचे कानातले फुल दाखवा असे म्हंटले.

त्यावेळेस दुकान मालक सतीश वाकडे यांनी सोन्याचे कानातले गोल फुले दाखवली. त्यानंतर त्या दोन व्यक्तींपैकी एकाने म्हटले की , दुकानाच्या बाजूला असलेल्या माझ्या बायकोला बोलावतो. त्यानंतर दुकान मालक सतीश वाकडे यांनी ती कानातली फुले लॉकर मध्ये ठेवली. त्यातील एका व्यक्तीने पाचशे रुपयाची चिल्लर मागितली. व दुसऱ्या व्यक्तीने त्यांना भ्रमित केले. बाजूलाच खुर्चीवर बसून असलेल्या इसमाने हात चलाकीचा वापर करीत लॉकरमध्ये ठेवलेले १०९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले किंमत अंदाजे आठ लाख रुपये हे बाहेर काढले. व तेथून तो निघून गेला. परंतु हा सर्व प्रसंग दुकानात लावलेल्या कॅमेऱ्याने व आजूबाजूला असलेल्या कॅमेऱ्याने टिपला.

दुकान मालक सतीश मधुकर वाकडे यांना काही वेळाने आपल्या दुकानातले लॉकरमध्ये असलेले १०९ ग्रॅम सोन्याचे कानातले चोरी झाल्याची घटना कळताच त्यांनी तात्काळ शहर पोलीस स्टेशनला माहिती दिली. घटनेची माहिती कळताच एलसीबी पथक , डीबी पथकासह शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार उमेश बेसरकर यांनी घटनास्थळ गाठले. व कॅमेराची तसेच घटनास्थळाची तपासणी केली.

दिवसाढवळ्या सकाळी पावणे अकरा वाजता च्या सुमारास ज्वेलर्स दुकानातून दोन चोरट्यांनी १०९ ग्रॅम सोन्याचे कानातले केल्याने संपूर्ण सराफा लाइन मध्ये खळबळ उडाली आहे., भीतीचे वातावरण पसरले आहे. याही पूर्वी ज्वेलर्सच्या दुकानातून सोन्याच्या दागिन्याच्या चोरीच्या घटना घडलेल्या आहे. त्यामुळे या चोरट्यांवर वेळीच आळा घालून त्यांचा कडक बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे .शहर पोलीस ठाण्यात कायदेशीर प्रक्रिया सुरू होती.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article