Risod Assembly Election: नागरिकांनी लोकशाहीच्या महोत्सवात सहभागी व्हावे: उपविभागीय अधिकारी देवकर

2 hours ago 1

आदर्श आचारसंहिता लागू

रिसोड (Risod Assembly Election) : भारत निवडणुक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला असुन त्याअनुषंगाने तात्काळ प्रभावाने आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघासाठी मंगळवारी (ता.२२) निवडणुकीची अधिसुचना प्रसिद्ध करणे व नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात येणार असुन २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. रिसोड मालेगाव मतदासंघातील सर्व मतदारांनी भयमुक्त वातावरणात

आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीच्या या महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली देवकर यांनी केले आहे रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघात एकूण 3,23,623 मतदार आहेत. मतदानासंदर्भातील सर्व तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली देवकर यांनी 16 ऑक्टोबर रोजी स्थानिक तहसील कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रतीक्षा तेजनकर तहसीलदार रिसोड, दीपक पुंडे तहसीलदार मालेगाव, सतीश शेवदा मुख्याधिकारी नगर परिषद ,रिसोड पंकज सोनुने मुख्याधिकारी मालेगाव प्रमुख उपस्थित होते अधिक माहिती देताना देवकर म्हणाले की, या मतदारांमध्ये १,६८,३७७ पुरुष तर १,५५,२४६ महिला मतदार आहेत. यामध्ये दिव्यांग मतदारांची संख्या 2834 असून 85 वर्षांवरील मतदारांची संख्या 3608 आहे. हे सर्व मतदार 350 मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावणार असून त्यापैकी 182 केंद्र रिसोड तालुक्यात असून शहरात 30 ग्रामीण भागात 152 मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत.

तर मालेगाव तालुक्यात 168 मतदान केंद्रे आहेत, त्यापैकी 18 शहरात आणि 150 ग्रामीण भागात आहेत. निवडणूक प्रक्रियेसाठी एकूण क्षेत्रीय अधिकारी 35, पोलिस क्षेत्रीय अधिकारी 35 असणार. एकूण 1450 कर्मचारी मतदानाच्या वेळी काम पाहतील, मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी महामंडळाच्या 38 बसेस असणार आहेत आणि इतर 70 खाजगी वाहने असतील.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article