Tantamukti Samiti: तंटामुक्ती समिती अध्यक्ष पदावरून झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू

2 hours ago 1

कळमनुरी तालुक्यातील माळ धावडा येथील घटना

आखाडा बाळापूर/हिंगोली (Tantamukti Samiti) : कळमनुरी तालुक्यातील माळधावंडा येथे महात्मा गांधी तंटामुक्त समीती अध्यक्ष होण्याच्या कारणावरून व पुर्वीच्या झालेल्या केस कारणावरून झालेल्या मारहाणीत गंभीर जखमीचा मृत्यू झाला सदर प्रकरणी बुधवार रोजी चार वाजता आठ जणाविरूद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

आखाडा बाळापूर पोलिसात आठ जणाविरूद्ध खूनाचा गुन्हा दाखल

याबाबत मिळालेल्या माहीतीनुसार कळमनुरी तालुक्यातील माळधावंडा येथील बाळासाहेब आनंदराव मस्के ( 56) यांना 13 आक्टोबर रोजी सहा ते साडेसहा वाजण्याच्या दरम्यान महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्ष होण्याच्या व पुर्वी झालेल्या केसेच्या कारणावरून गावातील तुकाराम महाराज मंदिर समोरच्या गावच्या चावडीसमोरील सार्वजनिक रोडवर गैरकायद्याची मंडळी जमवून लोखंडी रॉडने, काठीने जिवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली यात ते गंभीर जख्मी होउन 13 ते 15 रोजी पर्यंत बेशुद्ध अवस्थेत होते.15 रोजी त्यांचा मृत्यू झाला. अशा आशयाची फिर्याद अभिषेक बाळासाहेब मस्के यांनी आखाडा बाळापूर पोलीस स्थानकात बुधवारी दिली. यावरून शंकरराव भगवान मस्के,विकास शंकरराव मस्के,अविनाश शंकरराव मस्के, उर्मिला शंकरराव मस्के,विद्दा विकास मस्के,रूपाली अविनाश मस्के,दिलीपराव भगवान मस्के,भुजंगराव दिलीपराव मस्के सर्व रा.माळधावंडा यांच्याविरुद्ध खुऩाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक सुरेश दळवे, पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे, सहाय्यक पोलीस निरीक्षक डी.बी.बसवंते, पोलीस उपनिरीक्षक गणेश गोटके, शेख बाबरभाई, बिटप्रमुख सुनील रिठे, शिवाजी पवार पथकाने भेट दिली.सायंकाळी उशीरापर्यंत आरोपी अटक झालेली नव्हती.

आठ आरोपीपैकी तिन महिला

सदर गुन्ह्यात आठ जणाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन यात तिन महिला समावेश आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article