Youth Death: कोपरा फाटा जवळ दुचाकी झाडावर आदळली युवक ठार

2 hours ago 1

पुसद (Youth Death) :  कोपर फाटा येथे मित्राला सोडायला आलेल्या युवक घरी वापस जात असताना भरधाव वेगाने असलेली दुचाकी थेट झाडावर जाऊन आदळली या दुर्दैवी अपघातात 25 वर्षीय युवक जाग्यावरच ठार झाल्याची घटना 15 ऑक्टोंबर रोजी घडली. प्राप्त माहितीनुसार दि. 15 ऑक्टोंबर रोजी धारमोहा ता. महागाव येथील रहिवासी असलेला आकाश सुभाष कांबळे वय 25 वर्ष हा आपल्या मित्राला सोडायला पुसद येथे 15 ऑक्टोंबर च्या संध्याकाळी अंदाजे चार ते पाच वाजताच्या दरम्यान आला होता.

मित्राला सोडल्यानंतर अंदाजे सात वाजताच्या सुमारास तो पुसद वरून आपल्या राहत्या घर धारमोहा कडे जात असताना रस्त्यातच कोपरा फाटा येथे आकाश सुभाष कांबळे वय 25 वर्ष या युवकाची पल्सर 135 कंपनीची दुचाकी वाहन क्रमांक एम एच 14 ई एफ 0995 ही भरधाव वेगात असल्याने दुचाकीने कोपरा फाटा येथील रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाला जबर धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की , आकाश सुभाष कांबळे वय 25 वर्ष याचे डोके सरळ झाडाच्या खोडाला जाऊन आढळले. या (Youth Death) युवकाचा जाग्यावरच दुर्दैवी मृत्यू झाला.

काहीच वेळच्या अंतराने अंदाजे रात्री दहा वाजताच्या सुमारास या (Youth Death) घटनेची माहिती आकाशच्या मित्रपरिवाराला होताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतक आकाश याच्या मृतदेहास शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे आणले. दि. 16 ऑक्टोबर रोजी शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे मृतक आकाश सुभाष कांबळे वय 25 वर्ष याचे शवविच्छेदन करण्यात आले.आकाश चा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला आहे. या दुर्दैवी घटनेने मात्र सर्वसामान्यांचे मन हळहळले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article