शिक्षण संस्था चालक महिलेला सायबर भामट्याने गंडवले:मुलीची फी जास्त आल्याचे सांगून 72 हजार रुपयांची फसवणूक

2 hours ago 1
मॅडम मुलीची शाळेची फीस भरायची आहे. पैसे आल्याचा संदेश आला का ते पाहा असे म्हणत फीस भरताना 8 हजारांऐवजी चुकून 80 हजार रुपये सेंड झाले. कृपया 72 हजार रुपये परत करा, अशी विनंती करत सायबर भामट्याने एका संस्थाचालक महिलेला महिलेची 72 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची सिडको एन 4 परिसरात नर्सरी शाळा आहे. 12 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास फिर्यादी महिला सिडको एन 1, काळा गणपती मंदिराजवळून जात असताना त्यांना आरोपीने फोन केला. माझी मुलगी तुमच्या शाळेत शाळेत शिकत आहे. तिची फीस भरायची आहे, असे सांगत त्याने फोन सुरु असतानाच पैसे आल्याचा संदेश आला का ते पाहून घ्या असे म्हणाला. त्यावेळी फिर्यादीने मोबाइलवरील संदेश बघितला असता 80 हजार रुपये बँक खात्यात जमा झाल्याचे दिसले. त्यानंतर काही क्षणातच आरोपीने मॅडम चुकीने आठ हजार ऐवजी 80 हजार पाठवल्या गेले. मला 72 हजार रुपये परत करा, अशी विनंती केली. त्यावर विश्वास ठेवत शिक्षण संस्थाचालक असलेल्या फिर्यादी महिलेने 50 हजार व 22 हजार असे एकूण 72 हजार रुपये आरोपीला फोन पेद्वारे केले. फिर्यादीचे पैसे नजराना खातुन याच्या खात्यावर गेल्याचे दिसून आले. परंतु खातुन नावाची कोणीही विद्यार्थी शाळेत नसल्याचे फिर्यादी महिलेच्या लक्षात आले. फसवणूक झाल्याची शंका आल्याने फिर्यादी यांनी स्वतःचे बँक खात्याचे स्टेटमेंट बघितले असता त्यांच्या खात्यात 80 हजार रुपये जमा झाले नाही, पण 72 हजार रुपये फोन पे द्वारे आरोपीच्या खात्यात मात्र गेले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संस्थाचालक महिलांने तातडीने पोलिस विभागाच्या 1930 या हेल्पलाईनवर फसवणूक झाल्याबाबत तक्रार दिली होती. मात्र असे असतानाही प्रत्यक्ष मात्र सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात ३ ऑक्टोबरला गुन्हा दाखल करुन घेण्यात आल्याचे समोर आले आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article