Exit Poll Result 2024 Date : हरियाणा आणि जम्मू-काश्मीरचे एक्झिट पोल कधी? निवडणूक निकाल कधी?; जाणून घ्या A टू Z माहिती

2 hours ago 1

हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी शनिवार 5 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर केंद्रशासित प्रदेश असलेल्या जम्मू आणि काश्मीरमधील तीन टप्प्यातील मतदान पार पडलेलं आहे. दोन्ही राज्यातील निवडणूक निकाल लागणार आहेत. त्यापूर्वीच टीव्ही9 नेटवर्कसह विविध वृत्तवाहिन्या आणि संस्थांचे एक्झिट पोल जाहीर होणार आहेत.

हरियाणात उद्या शनिवारी संध्याकाळी 6.30 वाजता मतदान पार पडेल. त्यानंतर एक्झिट पोल यायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे हरियाणा आणि जम्मू आणि काश्मीरमधील मतदारांचा मूड कळणार आहे. या दोन्ही राज्यात कुणाचं सरकार येणार हे स्पष्ट होणरा आहे. त्यासाठी तुम्हाला खालील लिंकवर संपर्क साधावा लागेल. तिथूनच तुम्हाला एक्झिट पोलची इत्थंभूत माहिती मिळणार आहे.

निकालासाठी खालील लिंकवर क्लिक करा :-

https://www.youtube.com/@TV9MarathiLive/streams

https://www.tv9marathi.com/videos

जम्मू-काश्ममीरमध्ये किती टप्प्यात मतदान

पहिला टप्पा : पहिल्या टप्प्यासाठी 18 सप्टेंबर रोजी मतदान झालं. पहिल्या टप्प्यात 24 विधानसभा मतदारसंघात 61.38 टक्के मतदान झालं. दुसरा टप्पा : दुसऱ्या टप्प्याची निवडणूक 25 सप्टेंबर रोजी झाली. दुसऱ्या टप्प्यात 26 मतदारसंघात 57.31 टक्के मतदान झालं. तिसरा टप्पा : तिसऱ्या टप्प्यासाठी 1 ऑक्टोबर रोजी मतदान झालं. 40 विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 66.56 टक्ते मतदान पार पडलं.

जम्मू-काश्मीरमधील आधीचे निकाल काय होते?

जम्मू-काश्मीरमध्ये यापूर्वी 2014मध्ये निवडणुका झाल्या होत्या. 25 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर 2014 पर्यंत पाच टप्प्यात या निवडणुका पर पडल्या होत्या. 87 विधानसभा मतदारसंघ असलेल्या जम्मू-काश्मीरमध्ये पिपल्स डेमोक्रॅटिक पार्टीला 28 जागा मिळाल्या होत्या. भाजपला 25 जागा तर नॅशनल कॉन्फरन्सला 15 आणि काँग्रेसला 12 जागा मिळाल्या होत्या. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, जम्मू काश्मीर पिपल्स डेमोक्रॅटिक फ्रंटला प्रत्येकी एक जागा मिळाली होती. तर जम्मू काश्मीर पिपल्स कॉन्फन्सला दोन जागा मिळाल्या होत्या. तीन जागांवर अपक्ष निवडून आले होते.

हरियाणात काय घडलं?

हरियाणात एकूण 90 जागा आहेत. 21 ऑक्टोबर 2019मध्ये हरियाणात निवडणुका झाल्या होत्या. 24 ऑक्टोबर 2019 रोजी या निवडणुकीचे निकाल लागले होते. त्यावेळी भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. जननायक जनता पार्टी आणि सात अपक्षांनासोबत घेऊन भाजपने सरकार स्थापन केलं होतं. भाजपकडून मनोहर लाल खट्टर यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. तर जननायक जनता पार्टीचे नेते दुष्यंत चौटाला यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.

एक्झिट पोल काय असतं?

एक्झिट पोल हा निवडणुकीचा सर्व्हे असतो. मतदानाच्या काळात हा सर्व्हे केला जातो. अनेक संस्था हा सर्व्हे करतात. या संस्थांचे कर्मचारी मतदान केंद्राजवळ हजर असतात. जेव्हा मतदार मतदान करून बाहेर येतात तेव्हा एजन्सीचे कर्मचारी त्यांना काही प्रश्न विचारतात. त्यावरून मतदारांनी कुणाला मतदान केलं याचा अंदाज बांधला जातो. त्या आधारे रिपोर्ट तयार केली जाते. त्याचं राजकीय पक्ष आणि उमेदवारांसोबत मूल्यांकन केलं जातं. त्याच आधारे उमदेवार जिंकणार की हारणार याचा अंदाज काढला जातो.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article