शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांची ‘मातोश्री’ येथे पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेतून आदित्य ठाकरे यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केले. यादरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिवतीर्थावरील सभेचाही उल्लेख केला. शिवतीर्थावरील सभेत त्यांचं मन आणि हृदय सुद्धा रिकामे होते, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा शिवतीर्थावर पार पडली, या सभेविषयी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘जिथे माझ्या आजोबांचे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृति स्थळ आहे, त्या ठिकाणी त्यांची सभा घेण्याची हिंमत झाली. तिथे एवढी मोठी सभा आयोजित केली, पण खुर्च्या रिकाम्या होत्या, फक्त खुर्च्या रिकाम्या नव्हत्या तर त्यांचे मन आणि हृदय सुद्धा रिकाम होते’.