शिवसेनेचा एकच नाथ असल्याचे सिद्ध केले:हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जनता आपल्या बाजूने असल्याचे दाखवून दिले

1 hour ago 1
आनंद दिघेंचे शिष्य अशी ओळख सांगणारे शिंदे फार काळ टिकाव धरणार नाहीत, ४० आमदारांना घेऊन पक्ष चालवू शकणार नाहीत, असे म्हटले जात होते. पण अडीच वर्षांत त्यांनी बाजी पलटवली. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपणच शिवसेनेचे ‘एकनाथ’ असल्याचे दाखवून दिले. भाजपने संधी दिली नाही तर उपमुख्यमंत्रिपदावर समाधान मानतील भाजपने ठरवले तरच मुख्यमंत्रिपद मिळेल, अन्यथा उपमुख्यमंत्रिपदावर समाधान मानावे लागेल. उद्धव ठाकरेंकडील आमदारांना खेचण्याचा प्रयत्न करत पक्षबांधणीसाठी पावले टाकत राहतील. स्वत:ची कट्टर हिंदुत्ववादी कॉमन मॅन अशी प्रतिमा निर्माण केली 1 बाळासाहेब ठाकरे यांना अपेक्षित असलेलेच कट्टर हिंदुत्व आम्ही कायम राखत आहोत, त्यासाठीच बंड केले होते, हा मुद्दा गेली अडीच वर्षे सातत्याने लावून धरला. 2 उद्धव ठाकरे वैयक्तिक स्वरूपाची टीका करत असताना त्याला प्रत्युत्तर दिले नाही. उलट मी विकास कामांना प्राधान्य देतो, असे वारंवार सांगत राहिले. एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे 1 जागावाटपात शिंदेसेनेने त्याग करावा, अशी सूचना अमित शाह यांनी केल्यावर फारशी खळखळ केली नाही. प्रचाराची धुरा स्वत:च्या खांद्यावर घेत राज्यभर फिरले. 2 आपल्याकडे फक्त ४० आमदार आहेत, याचे भान ठेवत वेळोवेळी देवेंद्र फडणवीसांशी जुळवून घेतले आणि सोबतच स्वत:ची कॉमन मॅन अशी प्रतिमा निर्माण केली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article