सक्षम उमेदवार, मजबूत संघटन यामुळेच भाजप-शिंदेंची सरशी:आयत्यावेळच्या पक्षांतरालासुद्धा मतदारांनी थारा दिला नाही
2 hours ago
1
मुंबईत उद्धवसेनेपेक्षा तब्बल दीडपट जागा भाजपने जास्त पटकावल्या, तर कोकणातही शिंदेसेनेच्या बरोबरीने जागा पटकावत भाजपने या पट्ट्यावर आपली पकड मजबूत केली. सक्षम उमेदवार, संघटना आणि पैसा या इलेक्टोरल मेरिटच्या बळावर कोकण आणि मुंबईतील शिवसेनेचे पारंपरिक वर्चस्व मोडून अव्वलस्थानी येण्यात भाजप यशस्वी ठरला आहे. पश्चिम मुंबईत अपेक्षेप्रमाणे भाजपने उत्तम कामगिरी केली असून मध्य मुंबईत उद्धवसेनेने १० जागा घेतल्या असल्याने येत्या महापालिका निवडणुकीत भाजप आणि उद्धवसेनेतच खरी चुरस असेल हे निश्चित. घराण्यांच्या वारशाचा वरचष्मा असलेल्या कोकणामध्ये राणे बंधू आणि सामंत बंधू विजयी झाले.
अदिती तटकरे यांनीही आपल्या घराण्याचा गड राखला असला तरी पालघरमध्ये हितेंद्र ठाकूरांच्या बविआची सद्दी संपुष्टात आली आहे. या पट्ट्यात सपाने २, तर माकपने १ जागा राखली आहे. मनसेला मात्र एकमेव जागाही गमवावी लागली. त्यांना भोपळा फोडता आला नाही. घराण्यांचा प्रभाव कोकणामध्ये घराण्यांची परंपरा मोठी राजकीय आहे. राणे, तटकरे आणि सामंत यांच्या विजयांच्या रूपाने आता ती अधिकच ठळक हाेण्यास मदत आहे. धनशक्तीचा वापर सर्वच ठिकाणी यंदा पैशाच्या वारेमाप वापराचा मुद्दा कळीचा राहिला. त्याचा लाभ बहुतांश ठिकाणी प्रस्थापितांना झाल्याचे पाहायला मिळते. ते विरुद्ध आपण लोकसभेला मुस्लिमांच्या एकगठ्ठा मतदानाचा पॅटर्न यशस्वी ठरल्यामुळे यंदा ‘एक हैं तो सेफ हैं’ च्या नाऱ्यासोबतच ते विरुद्ध आपण हा मुद्दा प्रभावी ठरला.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)