पुन्हा एकदा लाटेवर स्वार होत नेवाशाने आमदार बदलला:लंघे यांनी केला आजी-माजी आमदारांचा पराभव
2 hours ago
1
पुन्हा एकदा लाटेवर स्वार होत नेवासे मतदार संघाने १५ दिवसांत नवीन आमदार निवडून आणला. प्रत्येक पंचवार्षिकला आमदार बदलण्याची परंपरा राखली. शिवसेनेचे विठ्ठलराव लंघे हे आजी-माजी आमदारांचा पराभव करीत ४०२१ मतांनी निवडून आले. आजच्या निकालाचे वैशिष्ट्य म्हणजे तीन प्रमुख उमेदवार वगळता इतर सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. नेवासे फाटा येथील गोडाऊनमध्ये झालेल्या मतमोजणीला पहिल्या फेरीपासूनच विठ्ठलराव लंघे हे आघाडीवर होते. वीस फेऱ्यापैकी ४ वेळा या फेऱ्यांमध्ये थोडी घट झाली. मात्र अाघाडी अखेरपर्यंत चार हजारांपेक्षा खाली आली नाही. नेवासे मतदारसंघात यावेळी शंकरराव गडाख हे आघाडी सरकारमध्ये मंत्री होते. त्यांनी सर्व यंत्रणेसह दोन वर्षे आधीपासूनच निवडणुकीची तयारी सुरू केली होती. महायुतीमध्ये अनेक इच्छुक असल्यामुळे एकसंघपणा कमी होता. शेवटच्या क्षणी मतदारसंघ शिवसेनेला गेल्याने भाजप जिल्हाध्यक्ष विठ्ठल लंघेंना उमेदवारी देण्यात आली. दोन दिवसांत महायुतीचे विखुरलेले नेते व सर्व इच्छुक उमेदवार यांना एकत्र करून महायुतीच्या नेत्यांनी एकी दाखवल्यामुळे हा विजय झाला. पण त्यात माजी आमदार बाळसाहेब मुरकुटे यांनी बंडखोरी करत व प्रहार पक्षातर्फे उमेदवारी केल्यामुळे तिरंगी वाटत असलेली निवडणूक मतदारांनी मात्र अखेरच्या टप्प्यात दुरंगी केली. तिघांच्याही प्रचारासाठी त्यांचे प्रमुख नेते आले होते. शंकरराव गडाख यांच्यासाठी उद्धव ठाकरे, बाळासाहेब मुरकुटे यांच्यासाठी तिसऱ्या आघाडीचे बच्चू कडू यांनी सभा घेतल्या, तर महायुतीच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, भाजपचे रावसाहेब दानवे यांच्या सभा झाल्या. बंडखोर बाळासाहेब मुरकुटे यांनी शनिदेवाची शपथ घेऊन सेटलमेंट केल्याच्या आराेपाने भाजपचे कार्यकर्ते त्यांच्यापासून दुरावले, तिथेच त्यांचा पराभव झाला. बाळासाहेब मुरकुटे यांनी ३५ हजार मते घेतली. लंघे ठरले जायंट किलर माजी आमदार वकीलराव लंघे यांचे पुत्र असलेले विठ्ठलराव लंघे गेल्या ४० वर्षांपासून राजकारणात आहेत. कारखान्याचे संचालक, बाजार समितीचे सभापती, जि. प. अध्यक्ष अशा विविध पदांवर काम करताना त्यांनी २००४ व २००९ या दोन वर्षे आमदारकीचे निवडणूक ही केली होती. २००४ साली नरेंद्र घुले यांच्याकडून ८२० मतांनी, तर २००९ मध्ये शंकरराव गडाख यांच्याकडून २० हजार मतांनी पराभव झाला होता. आजच्या विजयामुळे विठ्ठलराव लंघे यांनी २००९ च्या पराभवाची परतफेड वीस वर्षांनी केली.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)