Manoj Jarange Patil connected Chhagan Bhujbal : छगन भुजबळांनी नाशिकच्या येवल्यातील निवडणूक जिंकली. मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. जरांगेंनी सरकारला देखील इशारा दिला आहे. मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर बातमी......
छगन भुजबळ, मनोज जरांगे पाटीलImage Credit source: Facebook
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे छगन भुजबळ यांचा विजय झाला. नाशिकच्या येवला या मतदारसंघातून 26 हजार 681 मतांनी छगन भुजबळ विजयी झाले आहेत. या मतदारसंघातील ओबीसी विरूद्ध मराठा अशा झालेल्या या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. निवडणूक जिंकल्यानंतर काल झालेल्या विजयी रॅली काढली तेव्हा काही लोकांनी पहाटे तीन वाजेपर्यंत सभा घेतल्या. पण त्याचा काहीही फायदा झाला नाही, असं म्हणत भुजबळांनी मराठा आंदोलक मनोज जरांगेंवर निशाणा साधला आहे. यावर आता जरांगे यांनी आता प्रत्युत्तर दिलं आहे.
येडपटा तुला सांत्वन भेटी कळतात की नाही, मी राज्यात कुठे गेलो का? आलेले सरकार मराठ्यांच्या ताकदीवर आलेलं आहे. आम्ही मैदानात पाहिजे होतो तेव्हा दाखवला असता कचका आमच्या पॅर्टनचा… मराठा आरक्षण लवकर द्यायचं ,बेमानी करायची नाही. मी आणि माझा मराठा समाज मैदानात नव्हतो. सरकारने तातडीने मराठा आरक्षण द्यायचं नाही तर पुन्हा मराठे छाताडावर बसणार आहे. आमच्याशी बेमानी करायची नाही, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला पुन्हा इशारा दिला आहे.