– जरांगे पाटील फॅक्टर व फतव्याला मतदारांनी नाकारले
परभणी/गंगाखेड (MLA Dr. Ratnakar Gutte) : विधानसभा मतदार संघात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस महायुती पुरस्कृत रासपाचे विद्यमान आ. डॉ. रत्नाकर गुट्टे (MLA Dr. Ratnakar Gutte) यांनी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास शिवसेना उबाठाचे विशाल कदम यांचा दारुण पराभव करत दणदणीत विजय संपादन करून राज्याच्या विधान भवनात दुसऱ्यांदा प्रवेश मिळविला आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत जरांगे फॅक्टर व मौलानाच्या फतव्याला मतदारांनी नाकारल्याचे एकंदरीत चित्रावरून दिसत आहे.
अत्यंत अटीतटीच्या झालेल्या गंगाखेड विधानसभा निवडणुकीत भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस महायुती पुरस्कृत रासपाचे विद्यमान आ. डॉ. रत्नाकर गुट्टे (MLA Dr. Ratnakar Gutte) यांना १३९६८१ मते मिळविली त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास शिवसेना उबाठाचे विशाल कदम यांना ११३९६४ मते मिळाली यात महायुती पुरस्कृत रासपाचे उमेदवार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी २५७१७ मतांनी प्रतिस्पर्धी उमेदवार विशाल कदम यांचा पराभव केला. तर वंचित बहुजन आघाडीचे सिताराम घनदाट मामा यांना ४२६३० मते मिळाल्याने तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
याचप्रमाणे मनसे उमेदवार रुपेश देशमुख यांना २४६३, विठ्ठल रबदडे २४३४, माधव शिंदे १२०२, अलका साखरे ६०९, नामदेव गायकवाड ४६२, विष्णुदास भोसले ३३५, विठ्ठल निरस ४९२, विशाल कदम १४६३, संजीव प्रधान यांना ४९६ मते मिळाली तर नोटाला १४५१ मते मिळाली. सुरुवातीच्या काही फेरीत महाविकास आघाडीचे विशाल कदम आघाडीवर असतांना रासपाचे आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांना आघाडी मिळताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत १२ वाजेच्या दरम्यांनच विजयी रॅली काढली.
(MLA Dr. Ratnakar Gutte) गुट्टे यांना मिळालेली आघाडी मधेच कमी होऊन पुन्हा विशाल कदम यांना आघाडी मिळाल्याने कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली विसव्या फेरीनंतर विशाल कदम यांची आघाडी मोडत डॉ. रत्नाकर गुट्टे (MLA Dr. Ratnakar Gutte) यांनी मिळविलेली आघाडी शेवट पर्यंत कायम ठेवत २५७१७ मतांनी विजय संपादन केला. या निकालामुळे गंगाखेड विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत जरांगे फॅक्टर व मौलानाच्या फतव्याला मतदारांनी नाकारल्याचे एकंदरीत चित्रावरून दिसून आले.