विद्यमान आमदार दिलीप बनकर यांचा 29,239 इतक्या मोठ्या मताधिक्याने विजय झाला.Pudhari News network
Published on
:
24 Nov 2024, 11:19 am
Updated on
:
24 Nov 2024, 11:19 am
पिंपळगाव बसवंत : सुरेश पगारे
निफाड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार विद्यमान आमदार दिलीप बनकर यांचा 29,239 इतक्या मोठ्या मताधिक्याने विजय झाला. नाशिक जिल्ह्यात सर्वात अगोदर निफाड विधानसभा मतदारसंघाचा निकाल लावण्यात आम्ही यशस्वी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. हेमांगी पाटील यांनी सांगितले.
29,239 मतांच्या फरकाने मारली बाजी
वीस फेर्यांत लीड टिकवल्याने विजय झाला साकार
अनिल कदम यांच्या ओझर बालेकिल्ल्यातही मताधिक्य
मिळालेली मते
दिलीप बनकर - 1,20,253
अनिल कदम - 91,014
गुरुदेव कांदे - 4,121
निफाड विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार दिलीप बनकर आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल कदम यांच्यात झालेल्या सरळ लढतीमध्ये दिलीप बनकर यांनी बाजी मारली. त्यांनी कदम यांच्यावर 29,239 हजार मतांनी दणदणीत विजय मिळवला. आमदार बनकर यांनी पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत टिकवून ठेवली. पिंपळगाव या ‘हो पिच’वर अधिक मतदान मिळाले, तर ओझर येथील उमेदवार असतानाही अनिल कदम यांच्यापेक्षा अधिक मते मिळवली. महाविकास आघाडीचे अनिल कदम यांना ओझर या ‘हो पिच’वरही धोबीपछाड देत विजयी घोडदौड कायम ठेवली. सुरुवातीला पोस्टल मतदानात अनिल कदम यांना 762, तर बनकर यांना 560 मते मिळाली. ही फेरी वगळता, 20 फेर्यांध्ये बनकर यांनी विजयापर्यंत आघाडी कायम ठेवली. लाडकी बहीण योजना, महिलांना बस प्रवासात सवलत, शेतकर्यांना विमा, निफाड मतदारसंघात शेवटच्या टप्प्यात 1600 कोटींची विकासकामे, नांदूर मध्यमेेशर धरणाच्या 10 गेटच्या मंजुरीचे काम यामुळे मतदारांनी भरभरून मतदान केल्यामुळे बनकर यांनी मोठा विजय मिळवला.
महायुतीचे उमेदवार दिलीप बनकर यांचा विजय झाल्यावर पिंपळगाव बसवंत शहरातील निफाड फाटा येथे जोरदार विजयी मिरवणूक काढण्यात आली. या रॅलीमध्ये दोन जेसीबींच्या साहाय्याने जोरदार गुलालाची उधळण करून बनकर यांचा विजय साजरा करण्यात आला.
निफाड शहर आणि तालुक्यामध्ये ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी ढोल- ताशाच्या गजरात गुलालाची उधळण करत विजयाचा जल्लोष केला. उमेदवारीच्या स्पर्धेत असणारे ओझर येथील भाजपचे युवा नेते यतीन कदम यांनी पक्ष आदेशाने निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात प्रचारात सक्रिय सहभाग घेतला.
भाजप, आरएसएस, शिंदे गट शिवसेना पदाधिकारी यांनी झोकून काम केल्यामुळे आमदार बनकर यांचा विजय सुकर झाला असल्याचे दिसून आले.
मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली होती. नांदगाव, येवला, चांदवडसह काही ठिकाणी काही किरकोळ अनुचित प्रकार घडले आहेत.
दिलीप बनकर, आमदार
ही निवडणूक म्हणजे लोकशाहीचा खून आहे. मी पराभूत झालेलो असलो, तरी माझे राजकीय, सामाजिक काम थांबवणार नाही. ज्या मतदारांनी माझ्यावर विश्वास टाकला आहे, त्यांच्या विश्वासाचा आदर करून मी कार्यकर्त्यांसह कार्य सुरूच ठेवणार आहे.
अनिल कदम, पराभूत उमेदवार