Published on
:
24 Nov 2024, 1:25 pm
Updated on
:
24 Nov 2024, 1:25 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क : जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग 'आयपीएल'च्या यंदाच्या हंगामासाठी लिलाव सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात सुरु झाला आहे. आजपासून (दि. २४) हा लिलाव दोन दिवस चालणार आहे. या लिलावात 10 संघ निश्चित होणार आहेत. आजच्या लिलावात भारतीय खेळाडूंचा बोलबाला राहिला. श्रेयस अय्यरला पंजाबने २६.७५ कोटी रुपयांना खरेदी केले. यानंतर टीम इंडियाचा स्टार फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंत याने काही मिनिटांमध्ये श्रेयस अय्यरला पिछाडीवर टाकत आयपीएलमधील आजवरचा सर्वात महागडा खेळाडू म्हणून आपल्या नावाची नोंद केली. लखनौ संघाने ऋषभ पंतला २७ कोटींना खरेदी केले. तर पंजाब किंग्ज संघाने चहलसाठी १८ कोटींची बोली लावली. चहल हा आयपीएल लिलावातील आजवरचा भारताचा सर्वात महागडा फिरकी गोलंदाज ठरला आहे.
हरभजन सिंगने ट्विट करत घेतली 'फिरकी'
माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग यने ट्विट केले, "माझा चॅम्पियन भाऊ युजवेंद्र चहलसाठी 18 कोटी पंजाबमध्ये आपले स्वागत आहे. पाहा कांगारुही आता तुझी कॉपी करु लागले आहेत." या पोस्टला त्याने युजवेंद्र चहल यांचा सीमारेषा पार निवांत पहुडलेल्या फोटोबरोबर कांगारुचाही फोटो शेअर केला आहे.