लाडक्या बहिणींनी वर्षा निवासस्थानी एकनाथ शिंदेंचे केले औक्षण:शिंदे म्हणाले- लाडक्या बहिणींनी एवढा मोठा चमत्कार केला, आश्वासन पूर्ण करणार
2 hours ago
1
एकनाथ शिंदे यांचे औक्षण करण्यासाठी लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने वर्षा निवासस्थानी पोहोचल्या. यावेळी लाडक्या बहिणींनी एकनाथ शिंदे यांचे औक्षण केले. तसेच, त्यांचे अभिनंदनही केले. तसेच, यावेळी लाडक्या भावाचा विजय असो, अशी घोषणाबाजीही लाडक्या बहिणींकडून करण्यात आली. त्यासोबतच एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींचे आभार मानले असून दिलेले आश्वासन पूर्ण करणार असल्याचाही शब्द लाडक्या बहिणींना दिला आहे. यावेळी निलम गोऱ्हे यांनी पुढचे पाच वर्ष एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री झाले पाहिजेत, अशी इच्छा व्यक्त केली. मुख्यमंत्री बहीण लाडकी, विरोधकांच्या छातीत भरली धडकी शिंदे म्हणाले- लाडक्या बहिणींचे मी स्वागत करतो. त्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन. लाडक्या बहिणींनी या राज्यात इतिहास घडवला आहे. महायुतीने विकासाचं, कल्याणकारी योजनाचं काम केलं. त्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सर्वात सुपरहीट झाल्याचेही ते म्हणाले. माझ्या लाडक्या बहिणींमुळे अद्भूत आणि दैदिप्यमान विजय आम्हाला मिळाला आहे. लाडक्या बहिणींनी विरोधकांकडे विरोधी पक्षनेतेपद सुद्धा शिल्लक ठेवलं नाही. राज्यात लाडक्या बहीणींची लाट निर्माण झाली आणि या लाटेत विरोधी पक्ष वाहून गेला. हा चमत्कार लाडक्या बहिणींनी केला. त्यामुळेच तुम्ही आज मला भेटायला, शुभेच्छा द्यायला आलात. गरीब हटला पण गरिबी हटली नाही- शिंदे हा लाडका भाऊ कायम तुमच्या पाठीशी उभा असल्याचेही शिंदे म्हणाले. माझ्या लाडक्या बहिणींच्या परिवाराला काहीतरी हातभार लागला पाहिजे. म्हणूनच आम्ही ही योजना सुरू केली. तीन सिलेंडर मोफत देण्याचा निर्णयही आम्ही त्यासाठीच घेतला. म्हणून आपण म्हणतो की हे सरकार सर्वसामान्यांचं आहे, गरिबांचं आहे. काँग्रेस म्हणाले की, गरीबी हटावो, एकीकडे गरीब हटला पण गरिबी हटली नसल्याचा हल्लाबोलही शिंदेंनी काँग्रेसवर केला. लाडक्या बहिणीने विरोधकांना डम्पिंगमध्ये टाकले तसेच, लाडकी बहीण योजनेचे दिलेले एकवीसशे रुपयाचे आश्वासनही पूर्ण करणार असल्याचा शब्द त्यांनी लाडक्या बहिणींना दिला. डम्पिंग मेजॉरिटी येईल असे मी सांगत होतो. पण तुम्ही लाडक्या बहिणींनी विरोधकांना डम्पिंगमध्ये टाकल्याचा टोलाही त्यांना विरोधकांना लगावला. तुम्ही आज मला धन्यवाद, औक्षण आणि शुभेच्छा द्यायला आलात त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)