शरद पवार यांनी पहिले पक्ष फोडण्याचे काम केले त्यानंतर माझे घर फोडण्याचे काम केले आहे. आता तर त्यांचे केवळ दहा आमदार आल्यामुळे आता स्वत:च ते संपले असून त्यांचे राजकारण संपले असल्याची टीका माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम केली. धर्मराव बाबा आत्राम नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. शरद पवार निवडणुकीत अजित पवारासह महायुतीच्या सर्व नेत्यांना लक्ष्य केले होते. जाहीर सभामधून गद्दार म्हणून आमच्यावर टीका केली. जनतेची सहानुभुती मिळवण्यासाठी पावसात भिजले. मात्र ते लोकांना आवडले नाही. शरद पवार आमचे ज्येष्ठ नेते आहे. मात्र त्यांनी केलेले राजकारण जनतेला आवडले नाही. त्यामुळे त्यांचे राजकारण संपले. पावसात भिजण्याचे केवळ नाटक होते. अशा पावसात भिजल्याने सहानुभुती मिळत नाही. ते पावसात भिजले होते ते केवळ नाटक होते. त्यांनी प्रचाराच्या दरम्यान अनेक नाटके केली पण काही जमलं नाही. आघाडी ५०चा आकडा गाठू शकले नाही त्यामुळे विरोधकांचे राजकारण संपले असल्याची टीका त्यांनी केली. माझा विरोधात मुलीला निवडणुकीत उतरवले असले तरी मी बाप आहे. माझा विजय हा माझा नसून तो माझ्या मतदार संघातील लोकांचा विजय आहे. मतदार संघात केलेली विकास कामे आणि जनतेचा असलेला विश्वास यामुळे मला जनतेनी पसंती दिली. आता २०२९ मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी आतापासून कामाला लागले पाहिजे. माझ्या विरोधात निवडणुका लढवणारा पुतण्या असो की मुलगी असो, त्यांना माझ्या शुभेच्छा आहे. राजकारण राजकारणाच्या जागी असल्यामुळे त्याचा परिणाम आमच्या नात्यावर होणार नाही असेही आत्राम म्हणाले. विशेष म्हणजे आमच्या योजना आणि कामाची पद्धत आणि अजित पवार यांनी केलेले सहकार्य बघता आलेला निकाल माझा मोठा विजय असल्याचे आत्राम म्हणाले. आता शरद पवार यांच्याकडे दहा शिल्लक राहिले आहे. त्यांनी चिंता करु नये.ते दहा जण आमच्यासोबत घेऊ. मात्र त्या संदर्भात कोणाशीही अजुनही बोलणे झाले नाही. पाच वर्ष आता लोकांचे काम करणे हेच आमच्यासमोरचे ध्येय असल्याचे आत्राम म्हणाले.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)