Published on
:
24 Nov 2024, 11:25 am
Updated on
:
24 Nov 2024, 11:25 am
नागपूर : जिल्ह्यातील एकंदर बारा मतदारसंघात 217 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. शहरातील सहा मतदारसंघात 105 तर ग्रामीण मधील सहा मतदारसंघात ८८ उमेदवारांना आपले डिपॉझिट देखील वाचवता आले नाही. एकंदरीत 217 पैकी 193 उमेदवारांचे डिपॉझिट मतदारांनी, लाडक्या बहिणींनी जप्त केले आहे.
उमेदवार किंवा राजकीय पक्षांसाठी ही नामुष्कीची वेळ असते. विधानसभा निवडणुकीसाठी खुल्या गटात उमेदवारासाठी दहा हजार रुपये तर आरक्षित मतदारसंघातील उमेदवारांसाठी पाच हजार रुपये अनामत रक्कम म्हणून घेण्यात आली. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार वैध मताच्या 1/6 मते अनामत वाचवण्यासाठी आवश्यक असतात. पोस्टर बॅलेटचे मतदान करताना झालेल्या चुकांमुळे काही मते अवैध ठरविण्यात येतात. त्यामुळे वैध मतांच्याच आधारावर निर्धारित मतांचा हा आकडा ठरतो. यावेळी बसपा किंवा वंचित बहुजन आघाडी उमेदवार देखील कुठल्याच मतदारसंघात निर्णायक मते घेऊ शकले नाही. काँग्रेस आणि भाजप अशाच प्रामुख्याने लढती झाल्या यात भाजपने शहरात चार जागी तर ग्रामीणमध्ये चार जागी अशा 12 पैकी 8 जागा जिंकत मुसंडी मारली.