परभणी/पाथरी (Farmer Rabi Crops) : परभणी/पाथरी तालुक्यातील शेतशिवारामध्ये रब्बी हंगामामध्ये पिके बहरलेल्या अवस्थेत असताना शेतकऱ्यांना रानडुकरांच्या उपद्रवाला सामोरे जावे लागत आहे. शेतातील उभे ज्वारी पिक रडूकरांचे टोळके आडवे करत असल्याचे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
यंदा तालुक्यात सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाला आहे. (Farmer Rabi Crops) रब्बी हंगामाच्या सुरुवातीला ही पाऊस झाल्याने जमिनीतील पुरेशा चांगल्या ओली नंतर शेतकऱ्यांनी रब्बीमध्ये गहू ,हरभरा ,ज्वारीची आदी पिकांची पेरणी केली आहे. सध्या पिके बहरलेल्या अवस्थेत असून गोदावरी वरील बंधार्यांत पाणी असल्यामुळे किनारी भागामध्ये
वन्य प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यात उपद्रवी असणाऱ्या रानडुकरांची संख्या वाढली असून शेतातील उभ्या पिकांना नष्ट करण्याचे काम सध्या ते करत आहेत.
आधीच आसमानी संकटांनी भरडला गेलेला शेतकरी निसर्ग निर्मित या संकटामुळे मेटाकुटीला आला आहे .तालुक्यातील नाथरा गावातील शेतकरी रामेश्वर वाकणकर यांनी यावर्षी त्यांच्या मालकीच्या चार एकर क्षेत्रावर (Farmer Rabi Crops) रब्बीत ज्वारीची पेरणी केली आहे. या ज्वारी मध्येही रानडुकरांनी उच्छद मांडला आहे. शेतामध्ये पिकांचे नुकसान केले असून शेतकरी हतबल झाले आहेत. वन विभागाने रानडुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक शेतकऱ्या मधुन होत आहे.