रिसोड (Risod Election Result) : या निवडणुकीची मतगणना सुरुवाती पासुन अत्यंत चुरशीची होती.पहिल्या फेरी पासुनच आमदार भावनाताई गवळी प्रथम क्रमांकावर होत्या अकरावी फेरी गेम चेंजर ठरली. यामध्ये शिरपुर व दुधाळा सर्कलने आमदार झनक यांना जो लीड दिला तो लीड कायम ठेवत मताधिक्य देत शेवटच्या परि पर्यंत विजयापर्यंत नेला रिसोड काँग्रेसचा बालेकिल्ला कायम ठेवत अमित झनक चौथ्यांदा आमदारपदी आमदार म्हणुन काॅग्रेसचा बालेकिल्ला कायम ठेवला.
तर अपक्ष उमेदवार अनंतराव देशमुख यांनी एकुण पंचविस फे-यांच्या नेमके मध्यंतरा पासुन विधान परीषद आमदार भावनाताई गवळी यांच्यावर आघाडी घेत तिसऱ्या क्रमांकावर गेल्या,यावेळी आमदार अमित झनक यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गुलाल,अतिषबाजी करीत पेढे वाटुन विजयाचा आनंद साजरा केला. (Risod Election Result) निवडणुक प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस.मतमोजणी निरीक्षक श्री पी चंद्रया यांच्या आदेशानुसार निवडणुक निर्णय अधिकारी वैशाली देवकर,सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रतीक्षा तेजनकर,महसूल प्रशासनातील सर्व अधिकारी व कर्मचारी,सर्व नायब तहसीलदार व तहसील कार्यालयातील कर्मचारी,नोडल अधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले.
आ.अमित झनक =(नवनिर्वाचीत आमदार रिसोड मालेगांव विधान सभा)
हा माझा विजय नसुन रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेचा विजय असुन (Risod Election Result) रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघातील विकासकामांवर भर देऊन सर्वसामान्य जनतेचा तसेच तळागाळातील जनतेचा विश्वास कधीही तडा जाणार नाही.ग्राऊंड स्तरावरील मतदार व पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाची मी विकासकामांच्या माध्यमातुन परतफेड करेन.परिसरातील सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी सदैव तत्पर राहून विकासकामे करणार असल्याचे सांगितले.