महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीचा निकाल आज समोर आला आहे. महाराष्ट्रात भाजपला सर्वाधिक जागांवर आणि भाजपच्या महायुतीला बहुमत मिळालं आहे. तर झारखंडमध्ये काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चा या दोन्ही पक्षांच्या आघाडीला यश मिळालं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आघाडीचा पराभव तर झारखंडमध्ये काँग्रेस प्रणित आघाडीचा विजय झालाय. या निकालावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “तिकडचे काही सहकारी सांगत होते. एक आणखी एक अँगल त्याला काही लोक सांगतात. चार महिन्यापूर्वी एक निवडणूक झाली. हरियाणा, जम्मू काश्मीर. त्यात जम्मू काश्मीरमध्ये भाजपविरोधातील लोकांना यश आलं. हरियाणा भाजपकडे गेली. त्यानंतर दुसरी निवडणूक झाली. महाराष्ट्र ठरलेल्या महिन्यापेक्षा एक महिना लेट केली. ती झारखंडसोबत केली. झारखंडमध्ये काँग्रेसला यश आहे. इथे अपयश आहे. त्यामुळे एक लहान राज्य यशासाठी आणि मोठं राज्य सत्ताधाऱ्यांच्या कामासाठी. असा काही तरी गंमतीचा चेंज दिसतो. उद्या कोणी मशिनचा आरोप करायला नको. त्या राज्यात तुमचं राज्य आलं ना, तेव्हा हीच मशीन होती”, असं शरद पवार म्हणाले.
“भाजपने वोट जिहाद भूमिका मांडली. त्यातून धार्मिक ध्रुवीकरण करण्यात आलं असं म्हणता येईल. एकदम नकार देता येत नाही”, असं शरद पवार म्हणाले. “आमचा पराभव झाला. पण ईव्हीएम मशीन आणि यंत्रणा याबाबतचा पुरावा मिळत नाही. तोपर्यंत त्यावर बोलता येणार नाही”, अशी भूमिका शरद पवार यांनी मांडलं.
‘ज्यूडीशियरीची प्रतिष्ठा ठेवायला हवी’
“ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचं स्टटेमेंट वाचलं. त्याबाबतची मी त्यांच्याकडून माहिती घेणार आहे. माजी सरन्यायाधीश डी. चंद्रचूड यांच्यामुळे काही परिणाम झाला का? हे पाहणार आहोत. निकालाला उशिर झाल्याने निकाल असे आले का याची माहिती घेऊ. पण ज्यूडीशियरीची प्रतिष्ठा ठेवायला हवी. तिचं पावित्र्य ठेवण्याचं काम आमच्यासारख्या लोकांनी ठेवावं”, असं शरद पवार म्हणाले.
हे सुद्धा वाचा
‘कार्यकर्त्यांनी कष्ट खूप केले’
“आमच्या सर्व सहकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी कष्ट खूप केले. त्यात अडचण नाही. प्रमुख नेत्यांनी खूप कष्ट केले. तरीही हा निर्णय आला. त्यात लाडकी बहीण, धार्मिक अंडर देण्याचा प्रयत्न काही प्रवृतीने केला त्याचाही परिणाम असावा. एक चर्चा केली जाते की, समाजातील काही घटकांनी मतदानात वेगळा दृष्टीकोण घेतला असं म्हणतात. मला माहीत नाही. आम्ही त्या खोलात जाणार आहोत”, असंही शरद पवारांनी यावेळी सांगितलं.