– चौरंगी लढतीत एकतर्फी विजय
– कार्यकर्त्यांचा विजयी जल्लोश
– सुरेश वरपुडकरांचा १३ हजार २१९ मतांनी केला पराभव
परभणी/पाथरी (MLA Rajesh Vitekar) : पाथरी विधानसभा मतदारसंघात २००९ पासून सुरू असलेल्या आमदार निवडीचा सिंगल टर्म पॅटर्न यावेळीही मतदारांनी कायम ठेवला असुन राजेश विटेकर (MLA Rajesh Vitekar) हे मतदार संघाचे आमदार म्हणुन निवडूण आले आहेत . त्यांनी महाविकास आघाडीचे प्रतिस्पर्धी उमेदवार सुरेश वरपुडकर यांचा पराभव केला आहे .
पाथरी विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते . यावेळी दिग्गजांनी आपले नशीब आजमावले .निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यांमध्ये चौरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले होते. शनिवार २३ नोव्हेंबर रोजी शहरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे झालेल्या मतमोजणी मध्ये सुरुवातीच्या काही फेऱ्यांमधून ही लढत चौरंगी होणार असल्याचे जाणवू लागले होते.
परंतु पहिल्याच फेरीपासून आघाडी घेतलेल्या महायुतीचे उमेदवार राजेश विटेकर (MLA Rajesh Vitekar) यांनी एकतर्फी विजय खेचून आणला . विटेकर यांना ३० फेर्यांअंती निर्णायक ८३ हजार ७६७ मते मिळाली. त्यांनी प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार सुरेश वरपुडकर यांचा १३ हजार २१९ मतांनी पराभव केला. महायुतीच्या उमेदवाराचा विजय निश्चित दिसताच यावेळी कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्रा बाहेर विजयी जल्लोष सुरु केला होता. दरम्यान या निवडणुकीत रासपाचे सईद खान तिसऱ्या क्रमांकावर ,अपक्ष बाबाजानी दुर्राणी चौथ्या तर अपक्ष माधवराव फड पाचव्या स्थानी राहीले आहेत.