परभणी विधानसभा ३४ हजार २१४ मतांचे मताधिक्य
आनंद भरोसे यांना ९२ हजार ५७७ मते
परभणी (MLA Dr. Rahul Patil ) : सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत परभणी विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीचे उमेदवार आ.डॉ. राहुल पाटील यांचा ३४ हजार २१४ मतांनी विजय झाला. प्रतिस्पर्धी महायुतीचे उमेदवार आनंद भरोसे यांना ९२ हजार ५७७ मते पडली. तर विजयी उमेदवार आ. डॉ. राहुल पाटील (MLA Dr. Rahul Patil) यांना १ लाख २६ हजार ७९१ मते पडली. आ.डॉ. पाटील यांनी परभणी विधानसभेतून विजयाची हॅट्रीक साधली.
विधानसभा निवडणुकीसाठी बुधवार २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. शनिवारी सकाळी ८ वाजल्यापासून वनामकृवीतील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीला पोस्टल मत मोजण्यात आले. यामध्ये आ.डॉ. राहुल पाटील यांना १ हजार ९२० मते पडली. आनंद भरोसे यांना १ हजार २४६ मते पडली. परभणी विधानसभेत मतमोजणीच्या २५ फेर्या झाल्या. अंतीम मतमोजणीनंतर आ.डॉ. राहुल पाटील यांना १ लाख २६ हजार ७९१ मते पडली. तर आनंद भरोसे यांना ९२ हजार ५७७ मते पडली. आ. डॉ. पाटील (MLA Dr. Rahul Patil) यांचा निवडणुकीत विजय झाला आहे.