Whatsapp login devices : आपण जवळपास सर्वच जण मोठ्या प्रमाणावर व्हाट्सॲप वापरतो. तुम्हाला चॅट करायचं असेल, व्हिडीओ पाठवायचा असेल किंवा एखाद्याला महत्त्वाचा डॉक्युमेंट पाठवायचा असेल तर अशी अनेक कामे व्हाट्सअॅपच्या माध्यमातून काही सेकंदात आपण पूर्ण करतो. काही जणांच्या तर व्हाट्सॲप कामाचा भाग बनले आहे.
Whatsapp एक लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग ॲप आहे. जे प्रत्येक जण वापरतो. हे ॲप जगभरात सर्वाधिक पसंत केले जात आहे. म्हणूनच ॲपवर दररोज लाखो सक्रिय वापर करते आहेत. पण तुमचे व्हाट्सॲप कुठे चालू आहे हे तुम्हाला माहिती आहे का? ॲपमध्ये वापरकर्त्यांसाठी व्हाट्सॲपची अनेक उपयुक्त वैशिष्ट्य प्रदान करण्यात आली आहे. त्यापैकी एक वैशिष्ट्य असे आहे की तुम्हाला तुमचे व्हाट्सॲप कुठे चालू आहे, याची माहिती मिळते.
कोणते आहे ‘हे’ व्हाट्सॲप फीचर
या फीचर्स नाव आहे Linked Devices, या फीचर्स मदतीने तुम्ही तुमचे व्हाट्सॲप कुठे चालू आहे हे शोधू शकता. अनेक वेळा आपण व्हाट्सॲपवर लॉगिन करतो. पण लॉकआउट करायला विसरतो आणि व्हाट्सॲप लॉक इन राहते. याशिवाय तुम्ही इतर कोणत्याही डिव्हाईसवर तुमचा नंबर वापरून व्हाट्सॲपमध्ये लॉगिन केले असल्यास किंवा इतर कोणत्याही डिव्हाईसवर कोणीतरी तुमचा नंबर लॉगिन केला आहे की नाही हे देखील तुम्हाला कळेल.
सर्वप्रथम तुमचे व्हाट्सॲप सुरू करा. ॲप उघडल्यानंतर उजव्या बाजूला दिसणाऱ्या तीन डॉट आयकॉनवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला लिंक केलेल्या डिव्हाईस पर्यायावर क्लिक करावा लागेल. लिंक केलेल्या डिव्हाईस वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या व्हॉट्सॲप चालू असलेल्या डिव्हाईसची सूची दिसेल.
जर तुम्हाला या सूचीमध्ये असे कोणतेही उपकरण आढळले की जिथे तुम्ही खाते तयार केले नाही. तर तुम्ही या सूचीतील त्या डिव्हाईसच्या नावावर क्लिक करून दुसऱ्या डिव्हाईसवरून खाते लॉगआऊट देखील करू शकता.