टीम इंडियाच्या डेब्यूटंट हर्षित राणा याला पर्थ कसोटी सामन्यात धमकावणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याला मोठा झटका लागला आहे. मिचेल स्टार्क याला 13 कोटींचा फटका बसला आहे. मिचेल स्टार्क याने या पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी बॅटिंग करताना हर्षित राणा याला धमकावलं होतं. हर्षित राणा मिचेलला बाऊन्सर टाकत होता. यावरुन “मी तुझ्यापेक्षाही वेगाने बॉलिंग करु शकतो, माझी स्मरणशक्ती फार चांगली आहे”, असं स्टार्क हर्षितला म्हणाला होता. त्यानंतर अवघ्या काही तासांनी स्टार्कला मोठा झटका लागला आहे.
नक्की काय झालं?
आयपीएलच्या आगामी 18 व्या मोसमासाठी सौदी अरेबिया येथील जेद्दाह येथे मेगा ऑक्शनमध्ये मिचेल स्टार्कला मोठा झटका लागला आहे. केकेआरने रिलीज केल्यानंतर स्टार्कने त्याची बेस प्राईज 2 कोटी ठेवली होती. मिचेलचं नाव प्रमुख खेळाडूंच्या पहिल्या यादीत होतं. या यादीत 6 खेळाडूंची नावं होंती. ऑक्शनमध्ये स्टार्कवर बोली सुरु झाली. स्टार्क आयपीएलच्या 17 व्या मोसमातील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. स्टार्कला या मेगा ऑक्शनमध्ये मोठी रक्कम मिळण्याचा अंदाज होता. मात्र सर्व अंदाज चुकीचे ठरले. मिचेल स्टार्कवर फक्त 11 कोटी 75 लाख रुपयांची बोली लागली. दिल्लीने मिचेल स्टार्कला आपल्या ताफ्यात घेतलं. मिचेलला गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा 13 कोटींचा फटका बसला.
मिचेल स्टार्क दिल्ली कॅपिट्ल्सच्या गोटात
Mitchell Starc has a caller #IPL location 👏👏
He joins #DC for INR 11.75 Crore 👌👌#TATAIPLAuction | #TATAIPL | @DelhiCapitals pic.twitter.com/D24JGSkYuK
— IndianPremierLeague (@IPL) November 24, 2024
मिचेल स्टार्कसाठी गेल्या हंगामात सर्वात मोठी बोली लागली होती. तेव्हा कोलकाता नाईट रायडर्सने मिचेल स्टार्कसाठी 24 कोटी 75 लाख रुपये मोजले होते. मिचेल यासह आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळा़डू ठरलेला. मात्र वर्षभरातच स्टार्कला मोठा झटका लागला आहे.
मिचेल हर्षितला काय म्हणाला होता?
Mitch Starc offers a small informing to Harshit Rana 😆#AUSvIND pic.twitter.com/KoFFsdNbV2
— cricket.com.au (@cricketcomau) November 23, 2024
दरम्यान कोलकाता नाईट रायडर्सने मेगा ऑक्शनआधी एकूण 6 खेळाडू रिटेन केले होते. या 6 खेळाडूंमध्ये रिंकु सिंह, वरुण चक्रवर्थी, सुनील नरेन, आंद्रे रसेल, हर्षित राणा आणि रमनदीप सिंह यांचा समावेश आहे.