Jalgaon | जळगावमध्ये शत-प्रतिशत महायुती

2 hours ago 1

जळगाव : जळगाव ग्रामीण मतदारसंघातून विजय जाहीर होताच शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार गुलाबराव पाटील यांना खांद्यावर घेऊन जल्लोष करताना कार्यकर्ते. (छाया : नरेंद्र पाटील)

पुढारी वृत्तसेवा

Published on

24 Nov 2024, 9:10 am

Updated on

24 Nov 2024, 9:10 am

जळगाव जिल्ह्यात अपेक्षेप्रमाणे महायुतीने सर्व अकरा जागा जिंकत आपले वर्चस्व राखले आहे. महाविकास आघाडीला जिल्ह्यात खातेही उघडता आले नाही. कॉंग्रेसकडे असलेली रावेरची जागाही हातून गेली आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक लक्षवेधी ठरलेल्या जळगाव ग्रामीण, चाळीसगाव, जामनेर, मुक्ताईनगर, पाचोरा या ठिकाणी पुन्हा विद्यमानांनी मतदारांनी संधी दिली आहे. यामुळे जिल्ह्यात सर्वत्र युतीचा झेंडा फडकवला आहे.

  • काँग्रेसच्या हातून रावेरही गेले

  • मंत्री गिरीश महाजन पाचव्यांदा विजयी

  • आजी-माजी पालकमंत्र्यांच्या लढतीत गुलाबराव पाटील विजयी

  • मुक्ताईनगरमध्ये रोहिणी खडसेंचा पराभव

मतमोजणीला सकाळी साडेआठ वाजता प्रारंभ झाल्यानंतर सुरुवातीपासूनच युतीच्या उमेदवारांनी आघाडी घेतले होती. ती शेवटपर्यंत कायम दिसून आली. चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात भाजपचे मंगेश चव्हाण व शिवसेना (उबाठा) गटाचे उन्मेश पाटील यांच्यात लढत झाली. यात मंगेश चव्हाण यांनी जिल्ह्यात सर्वाधिक लीड घेत विजय नोंदविला.

जळगाव ग्रामीणमध्ये आजी-माजी पालकमंत्र्यांमध्ये मुख्य लढत झाली. यात शिवसेना शिंदे गटाचे गुलाबराव पाटील यांनी माजी पालकमंत्री तथा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार गुलाबराव देवकर यांचा पराभव केला.

राज्याचे लक्ष लागलेल्या जामनेर मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे मंत्री गिरीश महाजन यांनी आपला बालेकिल्ला अबाधित ठेवत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रा. दिलीप खोडपे यांचा परावभ केला. मुक्ताईनगर मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) रोहिणी खडसे यांचा पराभूत केला. तर पाचोरा येथील लक्षवेधी लढतीत शिवसेना शिंदे गटाचे किशोर आप्पा पाटील यांनी अपक्ष उमेदवार अमोल शिंदे व उबाठा वैशाली पाटील यांचा पराभव केला.

चोपड्यात शिवसेना शिंदे गटाचे चंद्रकांत सोनवणे व उबाठा गटाचे प्रभाकर सोनवणे यांच्यात सरळ लढत होऊन चंद्रकांत सोनवणे यांनी विजयश्री खेचून आणली. रावेरमध्ये भाजपचे अमोल जावळे यांनी काँग्रेसचे धनंजय चौधरी यांना आस्मान दाखवित कॉंग्रेसकडे असलेली एकमेव जागा खेचून आणली. भुसावळमध्ये पुन्हा भाजपचे संजय सावकारे यांनी विजय मिळवला. त्यांनी काँग्रेसचे डॉ. राजेश मानवतकर यांचा पराभव केला. जळगाव शहर मतदारसंघात भाजपचे सुरेश भोळे यांनी विजय नोंदवित उबाठाच्या जयश्री महाजन यांचा पराभव केला.

अमळनेरला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अनिल भाईदास पाटील यांनी अपक्ष व माजी आमदार शिरीष चौधरी व काँग्रेसचे डॉ. अनिल शिंदे यांना पराभूत केले. एरंडोलमध्ये शिवसेना शिंदे गटाचे अमोल चिमणराव पाटील यांनी माजी पालकमंत्री व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार डॉ. सतीश पाटील यांचा पराभव केला.

खडसेंची भावनिक साद मतदारांनी नाकारली

माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी मतदानाआधी आपण यापुढे निवडणूक लढणार नाही, पुढच्या निवडणुकीत असेल की, नसेल माहिती नाही. यावेळी मुलगी रोहिणी खडसेला निवडून देण्यासाठी साद घातली होती. मात्र, रोहिणी यांचा पराभव झाल्याने मतदारांनी भावनिक साद नाकारल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article