– मताधिक्याने आणला विजय खेचून
– माजी आ. विजय भांबळेंना मानावे लागले दुसऱ्या स्थानावर समाधान
परभणी/जिंतूर (MLA Meghna Bordikar) : सेलू विधानसभा निवडणुकीच्या तिरंगी लढतीत शनिवार 20 नोव्हेंबर रोजी मतमोजणीच्या दिवशी सरळ लढत आ. मेघना बोर्डीकर (MLA Meghna Bordikar) आणि माजी आ. विजय भांबळे यांच्यातच पाहायला मिळाली. दोघांमधील अटीतटीच्या लढतीत अंतिम फेरीत 4 हजार 396 मताधिक्य घेऊन आ मेघना बोर्डीकरांनी विजयाच्या इतिहासाची पुनरावृत्ती करून आपला गाद कायम राखला. तर प्रतिस्पर्धी माजी आ विजय भांबळे यांना दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले तर सुरेश नागरे तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघात मागील 20 वर्षांपासून बोर्डीकर – भांबळे कुटुंबियांचे निर्विवाद वर्चस्व पहायला मिळते. कधी बोर्डीकर (MLA Meghna Bordikar) कुटुंबीय तर कधी भांबळे कुटुंबीय मतदारसंघाची धुरा सांभाळत असल्याचे इतिहास आहे. पण यंदाच्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत तिरंगी लढतीचे चित्र असतांना माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर आणि विद्यमान आमदार मेघना बोर्डीकर यांनी आपल्या राजकीय कार्यकिर्दीच्या प्रगल्भ अनुभवाच्या बळावर चाणक्य बुद्धीचा वापर अरुण अभेद्य राजकीय क्लृप्त्यांचा चक्रव्यूह रचून सुमारे 4 हजार 396 मताधिक्य घेऊन विजयाच्या इतिहासाची पुनरावृत्ती करत आपला गड कायम ठेवण्यात यश मिळवले आहे.
सुरुवातीला जिंतूर तालुक्यातील मतमोजणी सुरू असताना माजी आमदार विजय भांबळे यांनी ठिकठिकाणी मताधिक्य घेतले होते मात्र 23 व्या फेरी नंतर आ. मेघना बोर्डीकरांनी (MLA Meghna Bordikar) मताधिक्य घेण्यास सुरुवात केल्यानंतर मागे वळूनच पाहिले नाही. सेलू तालुक्यातील मतदात्यांमधून मेघना बोर्डीकरांना चांगले प्रतिसाद मिळाल्याने त्यांनी विजय खेचून आणला. अंतिम फेरीनंतर आ मेघना बोर्डीकरांना 1 लाख 12 हजार 353 मते मिल्याने ते प्रथम स्थानी राहिले तर माजी आ विजय भांबळे यांना 1 लाख 7 हजार 957 मते मिळाल्याने त्यांना द्वितीय स्थानावर समाधान मानावे लागले आणि वंचितचे उमेदवार सुरेश नागरे यांना 55 हजार 838 मते मिळाल्याने ते तिसऱ्या स्थानावर राहिले.
कार्यकर्त्यांकडून विजयाची आतिषबाजी
आ. मेघना बोरकरांचा (MLA Meghna Bordikar) विजय घोषित झाल्यानंतर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नावाचेतनेचा संचार झाला आणि कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष करण्यासाठी शहरातून जयघोष करत दुचाकी रॅली काढलीच सोबतच प्रचंड प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी केली.
आ. मेघना बोर्डीकरांनी काढली विजय मिरवणूक
निवडणूक विभागाकडून मतमोजणी नंतर मेघना बोर्डीकरांच्या (MLA Meghna Bordikar) विजयाची अधिकृत घोषणा झाल्या नंतर माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्यासह आपल्या बहिणी आणि मातोश्री सोबत आ मेघना बोर्डीकर यांनी प्रचंड कार्यकर्त्यां सोबत शहरातील प्रमुख रस्त्यांवरन विजयी मिरवणूक काढून मतदात्यांचे आभार मानले.