चांदवड देवळा विधानसभा मतदार संघाच्या लोकप्रतिनिधी भाजपाचे उमेदवार डॉ. राहुल आहेर यांनी विजयश्री मिळविल्याने त्यांना प्रमाणपत्र देताना निवडणूक निर्णय अधिकारी कैलास कडलग, मंदार कुलकर्णी, मिलिंद कुलकर्णी.(छाया : सुनील थोरे).
Published on
:
24 Nov 2024, 7:25 am
Updated on
:
24 Nov 2024, 7:25 am
चांदवड देवळा विधानसभा मतदार संघाच्या चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार डॉ. राहुल आहेर यांनी एक लाख चार हजार ८२६ मते घेत हॅट्ट्रीक केली. त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार गणेश निंबाळकर यांचा ४८ हजार ९६१ मतांनी पराभव केला. निंबाळकर यांना ५५ हजार ८६५ मते मिळाली. माजी आमदार शिरीष कोतवाल, अपक्ष उमेदवार केदा आहेर यांनाही पराभवाचा सामना करावा लागला.
मिळालेली मते
डॉ. राहुल आहेर - १०४८२६
गणेश निंबाळकर- ५५८६५
केदा आहेर- ४८७२४
शिरीष कोतवाल- २३३३५
येथील प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात शनिवारी (दि. २३) सकाळी ८ वाजता मतमोजणीस निवडणूक निर्णय अधिकारी कैलास कडलग, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी मंदार कुलकर्णी, मिलिंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरवात करण्यात आली. यावेळी मतमोजणीस बूथनिहाय देवळा तालुक्यातून सुरुवात करण्यात आली. अपेक्षेप्रमाणे सुरवातीस डॉ. राहुल आहेरांनी पहिल्या फेरीत ३४७० मतांची आघाडी घेतली. देवळा तालुक्याच्या आठ फेऱ्यांमध्ये निर्णायक अशी २७ हजार मतांची भरभक्कम आघाडी घेतली. यानंतर चांदवड तालुक्यातील मतांची मोजणी करण्यात आली. यात देखील डॉ.आहेरांना मतांची आघाडी मिळाली. देवळा तालुक्यात अपक्ष उमेदवार केदा आहेरांना दोन नंबरची मते होती. त्यानतर वडनेरभैरव, वडाळीभोई, तळेगावरोही गटातील गावांमध्ये गणेश निंबाळकर यांनी मतांची आघाडी घेत केदा आहेर यांना मागे टाकले. माजी आमदार शिरीष कोतवाल हे शेवटपर्यंत ४ नंबरला होते. डॉ. राहुल आहेरांनी सुरुवातीपासून घेतलेली मतांची आघाडी शेवटपर्यंत एकाही उमेदवाराला तोडता आली नाही. त्यामुळे आहेरांचा विजय सरळसरळ सोपा झाला. सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास निवडणूक निर्णय अधिकारी कैलास कडलग यांनी डॉ. राहुल आहेरांनी १ लाख ४ हजार ८२६ मते मिळविल्याने त्यांचा विजय झाल्याचे घोषित केले. यावेळी चांदवड देवळा विधानसभा मतदार संघात विजयी झाल्याबद्दल डॉ. राहुल आहेरांना मा. कडलग यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.
देवळा तालुक्यासाठी नारपार प्रकल्प,
चनकापूर उजवा वाढीव कालव्याची दुरुस्ती,
रामेश्वर उमराणा ते झाडी एरंडगाव कालवा
पुणेगाव दरसवाडी पोहच कालवा,
माकडडोह पाझर तलाव
राहूड उसवाड डोंगरगाव कालवा दुरुस्ती
जलयुक्त शिवार, जलजीवन मिशन योजनेद्वारा पाणी पुरवठा,
अतिवृष्टी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय आर्थिक मदत,
लाडकी बहीण योजनेचे गट, गणात मेळावे घेत १ लाख महिलांना लाभ
शेतमजूर, मजूर, कामगार यांना मोफत भांडे वाटप.