हिंगोली जिल्ह्यात महाविकास आघाडीचा सुपडा साफ
हिंगोली (Hingoli Election Results) : जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदार संघ महायुतीच्या खात्यात गेले असून तिन्ही ठिकाणी विद्यमान आमदारांना पुन्हा संधी मिळाली आहे. जिल्ह्यातून महाविकास आघाडीचा मात्र सुपडा साफ झाला आहे.
हिंगोली विधानसभा मतदार संघात महायुती व महाविकास आघाडी या दोन्ही बाजूने मोठी बंडखोरी झाली होती. भारतीय जनता पक्षाने विद्यमान आमदार तान्हाजी मुटकुळे यांना उमेदवारी दिल्याने नाराज असलेल्या रामदास पाटील सुमठाणकर यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. आ.तान्हाजी मुटकुळे यांनी ७४५८४ मते
घेऊन सौ.रूपाली पाटील यांचा ११०२१ मतांनी पराभव केला. भाजपचे तान्हाजी मुटकुळे यांनी सलग तिसरा विजय मिळवित ‘हॅट्रीक’ साधली आहे.
तिसर्या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश थोरात यांनी २३९४४ मते घेतली. चौथ्या क्रमांकावर असलेल्या काँग्रेसचे बंडखोर उमेदवार माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी २२२६७मते मिळविली. पाचव्या क्रमांकावर असलेल्या डॉ.रमेश शिंदे यांना १९३३६ मते मिळाली तर सहाव्या क्रमांकावर राहिलेल्या रामदास पाटील सुमठाणकर यांनी १०९१८ मते मिळविली.
राज्यभर चर्चेत असलेल्या (Hingoli Election Results() कळमनुरी विधानसभा मतदार संघात मात्र एकास एक लढत झाली. येथे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी १२२०१६ मते घेऊन शिवसेना उबाठाच्या डॉ.संतोष टारफे यांचा ३१०८३ मतांनी पराभव केला. डॉ.टारफे यांना ९०९३३ मते मिळाली. येथे वंचित बहुजन आघाडीतर्पेâ नशीब आजमावणार्या डॉ.दिलीप मस्के यांना तिसर्या क्रमांकावर १८ हजार २५९ मते मिळाली. येथील आणखी एक अपक्ष उमेदवार अजित मगर यांना ४ हजार २१२ मते मिळाली. मागील विधानसभा निवडणुकीत अजित मगर यांनी वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढविली होती त्यावेळी त्यांना ६६ हजार १३७ मते मिळाली होती.
वसमत विधानसभा मतदार संघात (Hingoli Election Results) राष्ट्रवादी विरूद्ध राष्ट्रवादी अशा गुरू शिष्याच्या लढतीत शिष्याने गुरूचा पराभव केला. येथे प्रारंभी पासून तिरंगी वाटत असलेली लढत मतमोजणीच्या दिवशी एकतर्फीच दिसून आली. येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार राजू भैय्या नवघरे यांनी १ लाख ७ हजार ६५५ मते घेऊन माजीमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार जयप्रकाश दांडेगावकर यांचा २९५८८ मतांनी पराभव केला. दांडेगावकरांना ७८०६७ मते मिळाली. येथे तिसर्या क्रमांकावर असलेल्या जनस्वराज्य पक्षाचे गुरू पादेश्वर यांनी ३५ हजार २१९ मते घेतली. येथे काँग्रेसच्या प्रिती जैस्वाल यांनी बंडखोरी करून वंचित बहुजन आघाडीतर्पेâ निवडणूक लढविली होती. त्यांना १४ हजार २७ मते पडली.
जातीय धु्वीकरण आले मविआला अंगलट
मराठा व मुस्लिम मतांच्या जोरावर विजयाचा दावा करणार्या महाविकास आघाडीला राज्याप्रमाणे हिंगोलीतही जातीय धु्रवीकरण अंगलट आले. जिल्ह्यातील हिंगोली व वसमत या दोन मतदार संघात मराठा मतदार मोठ्या प्रमाणावर आहेत. कळमनुरी विधानसभेतही इतर दोन मतदार संघांच्या तुलनेत मराठा मतदार कमी असले तरी सर्वाधिक मतदार मात्र मराठा समाजाचेच आहेत. या सोबतच मुस्लिम मतदारांची संख्या तिनही मतदार संघांत लक्षणीय आहे. याच मतदारांवर आघाडीची एकूण भिस्त होती. जातीय धु्रवीकरणाच्या पृष्ठभूमिवर सोयाबीनसहीत शेती मालाला मिळणारा कमी भाव, महाग झालेले शेतकी साहित्य, सिंचनात जिल्ह्याचे मागासलेपण आदी सर्व मुद्दे मागे पडले.
महाविकास आघाडीच्या (Hingoli Election Results) उमेदवारांकडून काही विशिष्ट समाजांना प्राधान्य मिळत असल्याने ओबीसी व इतर मतदार आपोआप महायुतीच्या बाजूने झुकले. शिवाय तिनही मतदार संघात विद्यमान आमदारांना लढत देणारे उमेदवार इतर संसाधनांत कमी पडले. आघाडीतील मित्र पक्षाच्या नेत्यांनी ज्या मतदार संघात आपल्या पक्षाचा उमेदवार आहे, त्या मतदार संघाकडे अधिक लक्ष दिले. शिवाय लोकसभेत मिळालेल्या यशामुळे आलेला अति आत्मविश्वासही आघाडीच्या उमेदवारांना नडला.