हिंगोली (Hingoli Election Results) : हिंगोली जिल्ह्यातील 92-वसमत विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस चंद्रकांत उर्फ राजूभैय्या रमाकांत नवघरे, 93-कळमनुरी विधानसभा मतदार संघातून शिवसेना उमेदवार संतोष लक्ष्मणराव बांगर आणि 94-हिंगोली विधानसभा मतदार संघातून भारतीय जनता पक्षाचे तान्हाजी सखारामजी मुटकुळे हे विजयी झाल्याचे संबंधित विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी घोषित केले आहे. जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांना उमेदवारनिहाय मिळालेल्या मतांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
92-वसमत विधानसभा मतदार संघ :
92-वसमत विधानसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार चंद्रकांत उर्फ राजुभैय्या रमाकांत नवघरे (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) यांना 1 लक्ष 7 हजार 655 मते पडली आहेत, तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार दांडेगावकर जयप्रकाश रावसाहेब साळुंके (राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार) यांना 78 हजार 067 मते मिळाली आहेत. तसेच इतर उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे आहेत.
नागिंदर भिमराव लांडगे (बहुजन समाज पार्टी) यांना 806, गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज (बापु) (जन सुराज्य शक्ती) यांना 35 हजार 219, जैस्वाल प्रिती मनोज (वंचित बहुजन आघाडी) यांना 14 हजार 027, मुंजाजी सटवाजी बंडे (राष्ट्रीय समाज पक्ष) 596 मते मिळाली आहेत. तर अपक्ष उमेदवार जगन्नाथ लिंबाजी अडकिणे यांना 2764, तनपुरे मंगेश शिवाजी यांना 269, बांगर रामप्रसाद नारायणराव यांना 402, रघुनाथ सुभानजी सुर्यवंशी यांना 623, रामचंद्र नरहरी काळे यांना 569 आणि नोटाला 1423 मते मिळाली आहेत.
93- कळमनुरी विधानसभा मतदारसंघ
93-कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार संतोष लक्ष्मणराव बांगर (शिवसेना) 1 लक्ष 22 हजार 016 मते पडली आहेत, तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार डॉ. संतोष कौतिका टारफे (शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांना 90 हजार 933 मते मिळाली आहेत. तसेच इतर उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे आहेत.
विजय माणिकराव बलखंडे (बहुजन समाज पक्ष) यांना 925, अफजल शरीफ शेख (रिपब्लीकन सेना) यांना 1313, डॉ. दिलीप मस्के (नाईक) (वंचित बहुजन आघाडी) यांना 18 हजार 259, मुस्ताक ईसाक शेख (हिंदुस्तान जनता पार्टी) यांना 384, मेहराज अ. शेख मस्तान शेख (ऑल इंडिया मजलिस-ए-इन्कलाब-ए- मिल्लत) यांना 159, शिवाजी बाबुराव सवंडकर (महाराष्ट्र स्वराज्य पक्ष) यांना 474, डॉ. संजय तुळशीराम लोंढे (राष्ट्रीय समाज पक्ष) यांना 168, तर अपक्ष उमेदवार अजित मगर यांना 4212, उद्धव बालासाहेब कदम 139, जाबेर एजाज शेख 134, टार्फे संतोष अंबादास 553, टार्फे संतोष लक्ष्मण 1966, देवजी गंगाराम आसोले 218, पठाण जुबेर खान जब्बार खान 1256, पठाण सत्तार खान 1220, प्रकाश विठ्ठलराव घुन्नर 192, इंजिनिअर बुद्धभूषण वसंत पाईकराव यांना 732 आणि नोटाला 432 मते मिळाली आहेत.
94- हिंगोली विधानसभा मतदारसंघ
94-हिंगोली विधानसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार तान्हाजी सखारामजी मुटकुळे (भारतीय जनता पार्टी) 74 हजार 584 मते पडली आहेत, तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार रुपालीताई राजेश पाटील (शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांना 63 हजार 658 मते मिळाली आहेत. तसेच इतर उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे आहेत.
प्रमोद उर्फ बंडू कुटे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) यांना 2287, ॲड. साहेबराव किसनराव सिरसाठ (बहुजन समाज पार्टी) यांना 1325, उत्तम मारोती धाबे (अखंड हिंद पार्टी) यांना 544, दिपक धनराज धुरिया (भारतीय जनसम्राट पार्टी) यांना 559, पंजाब नारायण हराळ (राष्ट्रीय समाज पक्ष) यांना 900, प्रकाश दत्तराव थोरात (वंचित बहुजन आघाडी) यांना 23 हजार 944, मुत्तवली पठाण अतिक खान ताहेर खान (मायनॉरिटीज डेमोक्रेटीक पार्टी) यांना 488, रवि जाधव सवनेकर (अभिनव भारत जनसेवा पक्ष) यांना 163, सर्जेराव निवृत्ती खंदारे (ऑल इंडिया हिंदुस्तान काँग्रेस पार्टी) यांना 283, सुनील दशरथ इंगोले (भीमसेना) यांना 271, सोपान शंकरराव पाटोडे (बहुजन भारत पार्टी) यांना 510, तर अपक्ष उमेदवार ॲड. अभिजीत दिलीप खंदारे यांना 2124, आनंद राजाराम धुळे 919, अ. कदीर मस्तान सय्यद (गोरेगावकर) 718, गोविंद पांडुरंग वाव्हळ 497, गोविंदराव नामदेव गुठ्ठे 1551, भाऊराव बाबुराव पाटील 22 हजार 267, मुक्तारोद्दीन अजिजोद्दीन शेख 872, रमेश विठ्ठलराव शिंदे 19 हजार 336, विमलकुमार सुभाषचंद्र शर्मा 437, सुमठाणकर रामदास पाटील यांना 10 हजार 918 आणि नोटाला 665 मते मिळाली आहेत.